लोकसभा निवडणुकीपूर्वी अशोक चव्हाण हे भाजपात गेल्याने हंबर्डे देखील भाजपमध्ये जातील असं बोललं जात होतं, मात्र त्यांनी काँग्रेसमध्ये राहणं पसंत केलं. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला चांगलाच फटका बसला आहे. नांदेड जिल्ह्यात काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही. काँग्रेसच्या दोन विद्यमान आमदारांचा निवडणुकीत पराभव झाला. पराभवाची कारणमीमांसा सुरु असतानाच नांदेडमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. निवडणुकीत पराभव झालेले काँग्रेसचे माजी आमदार मोहन हंबर्डे हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. येत्या दोन ते तीन दिवसात हंबर्डे हे राष्ट्रवादीच्या नेत्यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे.माजी आमदार मोहन हंबर्डे हे २००८ पर्यंत राष्ट्रवादी पक्षात होते. पंचायत समितीमध्ये उपसभापती देखील होते.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या १७ दिवसांपूर्वी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून नांदेड दक्षिण मतदारसंघातून निवडणूक लढवली होती आणि त्यात त्यांनी विजयी मिळवला. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात त्यांनी विजय मिळवला. मोहन हंबर्डे हे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे विश्वासू मानले जायायचे. विधान परिषदेच्या क्रॉस वोटिंग प्रकरणातही त्यांचं नाव चर्चेत आलं होतं. लोकसभा निवडणुकीपूर्वी अशोक चव्हाण हे भाजपात गेल्याने हंबर्डे देखील भाजपमध्ये जातील असं बोललं जात होतं, मात्र त्यांनी काँग्रेसमध्ये राहणं पसंत केलं. दरम्यान विधानसभा निवडणुकीत हंबर्डे यांनी नांदेड दक्षिणमधून निवडणूक लढवली, मात्र दोन हजार मतांनी त्यांचा निसटता पराभव झाला. पराभवाची कारणं शोधत असताना मोहन हंबर्डे हे राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लक्षात घेता उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील पक्ष वाढीसाठी प्रयत्न सुरु केले आहे.विधानसभा निवडणुकीत माजी आमदार मोहन हंबर्डे यांचा निसटता पराभव झाला. शिवसेना शिंदे गटाचे आमदार आनंद बोढारकर यांच्याकडून अवघ्या दोन हजार मतांनी पराभव झाला आहे. या पराभवानंतर मोहन हंबर्डे हे पक्षाच्या कार्यक्रमापासून अलिप्त राहत असल्याचे पाहायला मिळत आहेत. निवडणुकीनंतर त्यांनी काँग्रेसच्या एकाही कार्यक्रमाला हजेरी लावली नाहीये. त्यातच आता मोहन हंबर्डे हे राष्ट्रवादी अजित पवार गटात जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून त्यांचं राजकीय पुनवर्सन होणार की मोठी जबाबदारी मिळणार याकडे लक्ष लागले आहे.