शपथविधीसाठी सहकुटुंब विधानसभेत, पण मविआचा बहिष्कार; काँग्रेस आमदार अमित झनक म्हणाले…

रिसोड विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार अमित झनक निवडून आले. शपथविधीसाठी ते विधान भवनात आले, मात्र महाविकास आघाडीने शपथविधीवर बहिष्कार घातल्याने ते रविवारी शपथ घेतील.

 रिसोड विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार अमित झनक हे सहपरिवार शपथविधीसाठी विधान भवनात दाखल झाले. मात्र विरोधकांनी शपथविधीवर बहिष्कार घातल्याने झनक यांना शपथ घेता आली नाही. अमित झनक त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी आणि मुलगाही विधानभवनात दाखल झाले होते. यावेळी त्यांच्या पत्नीने आपल्या भावना व्यक्त केल्या अमित झनक विधानसभेत निवडणून आल्यानंतर त्यांच्या पत्नीने आनंद व्यक्त केला. हा आमच्यासाठी अविस्मरणीय क्षण आहे. अमित झनक चौथ्यांदा निवडून आले आहेत. हा अभिमानास्पद क्षण आहे. मी पहिल्यांदा शपथविधी पाहण्यासाठी आली असल्याची भावना त्यांच्या पत्नीने व्यक्त केली आहेत. महाविकास  आघाडीच्या नेत्यांनी आजच्या ऐवजी उद्या रविवारी शपथविधी घेण्याचं ठरवलं आहे. मात्र रिसोड विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार अमित झनक हे शनिवारीच शपथविधीसाठी विधानभवनात हजर झाले होते. याबाबत प्रतिक्रिया देताना अमित झनक म्हणाले, आम्ही शपथविधीसाठीच्या तयारीने आलो होतो. पण आजच्या ऐवजी उद्या शपथविधी होईल. ज्येष्ठ नेत्यांनी ठरवल्याप्रमाणे महाविकास आघाडीचा शपथविधी उद्या होईल. त्यांनी खास शपथविधीसाठी घातलेल्या जॅकेटबाबतही विधान केलं. ते म्हणाले, दिगांबरी जैन समाजाचं हातमाग केंद्र आहे. मी निवडून आल्यानंतर तिथे मी आशीर्वाद घेण्यासाठी गेलो, त्यावेळी त्यांनी हे जॅकेट भेट दिलं. त्याचवेळी मी त्यांना कबूल केलं होतं, की ज्यावेळी मी शपथविधीसाठी सभागृहात जाईन, त्यावेळी हेच जॅकेट घालेन. बोलल्याप्रमाणे मी हे जॅकेट घातलं आहे.

काही गोष्टीत आम्ही कमी पडलो असू, पक्षपातळीवर त्या गोष्टीवर विचार सुरू आहे. जे काही बदल करायचे असतील, मोठी मंडळी त्याबाबतीत लवकरच निर्णय घेतील. संघटनेत असतील किंवा पक्षपातळीवर असतील ते निर्णय होतील. पण आम्ही एकत्र लढलो, कमी संख्येने जिंकलो असलो, तरी पुढे पक्षाचा आवाज असेल, सामान्य माणसाचा, शेतकऱ्याचा, कष्टकऱ्याचा आवाज सभागृहात मांडण्याचा प्रयत्न करू, अशी प्रतिक्रिया अमित झनक त्यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *