काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला राज्यात मोठा धक्का बसला. भाजपने २८ जागा लढवल्या. त्यापैकी ९ जागांवर त्यांना विजय मिळाला. तर, महायुतीला राज्यात १७ जागांवर विजय मिळाला. राज्यात विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने मोठं यश मिळवलं तर महाविकास आघाडीला मोठा फटका बसला आहे. त्यानंतर आता भाजप महाविकास आघाडीला धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं दिसून येत आहे. भाजपमधील वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विधानसभेतील दारुण पराभवानंतर मविआतील काही खासदार भाजपच्या संपर्कात आहेत. लवकरच महाविकास आघाडीतील काही खासदार राजीनामा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजप महाराष्ट्रात ‘मिशन लोटस’ राबवणार का? असा प्रश्न देखील आता उपस्थित होत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे काही खासदार भाजपच्या संपर्कात असल्याचं भाजपने दावा केला आहे. या बातमीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला राज्यात मोठा धक्का बसला. भाजपने २८ जागा लढवल्या. त्यापैकी ९ जागांवर त्यांना विजय मिळाला. तर, महायुतीला राज्यात १७ जागांवर विजय मिळाला. महाविकास आघाडीला ३० जागांवर विजय मिळाला. तर, एका जागी अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा विजय झाला. त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. याबाबात आज माध्यमांशी बोलताना शिवसेना ठाकरेंच्या पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. संजय राऊत म्हणाले की, ”भारतीय जनता पक्ष असं कोणतीही ऑपरेशन्स करू शकतो. त्यांच्याकडे पैसा आहे. त्यांच्याकडे मोठी यंत्रणा आहे. दहशत निर्माण करून अशा प्रकारे माणसं फोडणे ते करू शकतात. याआधी देखील एकनाथ शिंदे यांच्यासारखे किंवा अजित पवार यांच्यासारखे लोक का त्यांच्यासोबत गेले? ते देखील भीतीपोटीच भाजपसोबत गेले, ते काय ऑपरेशन लोटस होतं का नाही. ते तर ऑपरेशन डर होतं. पळून घाबरून गेले ते. भीती दाखवायची आणि पळवायचं आणि मग तुम्ही तिथे गेल्यावर सर्व खटले मागे घ्यायचे. तुमची जप्त केलेली संपत्ती परत द्यायची. हे यांचे धंदे आहेत. नैतिकता नावाचा कोणताही प्रकार मला भारतीय जनता पक्षाच्या सत्तेमध्ये दिसत नाही, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.