इथे निकाल लागला, अन् तिथे ठाकरे गटाला गळती; भाजप प्रवेशासाठी रांग, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का.

 ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपचा झेंडा हाती धरला. हा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर भाजपमध्ये प्रवेशांची रांगच रांग लागलेली पाहायला मिळत आहे. गेली दोन वर्ष भाजप आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली कणकवली विधानसभा मतदारसंघातील इतर पक्षांचे पदाधिकारी आणि नगरसेवक मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पक्षात प्रवेश करताना पाहायला मिळाले. आता ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपचा झेंडा हाती धरला. हा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.नितेश राणे यांच्या ओम गणेश निवासस्थानी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या वाभवे वैभववाडी नगरपंचायतील नगरसेवक आणि वाभवे विकास सोसायटीचे व्हाइस चेअरमन रणजित हरिचंद्र तावडे यांनी बाबा तावडे, अभिजित तावडे यांच्यासह नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीत पक्ष प्रवेश केला.

रणजित तावडे यांच्या भाजप प्रवेशामुळे वाभवे वैभववाडी नगरपंचायतीत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा एकच नगरसेवक शिल्लक राहिला आहे. विकासाचे व्हिजन नजरेसमोर ठेवून उद्धव ठाकरे गटाचे नगरसेवक यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्याची प्रतिक्रिया दिली आहे. नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसल्याचं म्हटलं जात आहे. आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत आज ओम गणेश निवासस्थानी भारतीय जनता पार्टीत हा पक्ष प्रवेश पार पडला. यावेळी नितेश राणे यांनी प्रवेश करणाऱ्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचं स्वागत केलं आहे. तावडेंच्या भाजपा प्रवेशानंतर येथे ठाकरे गटाचे अस्तित्व संपुष्टात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वैभववाडी नगरपंचायतीमधील प्रभाग क्रमांक १६ मध्ये रणजीत तावडे हे नगरसेवक पदावर निवडून आले होते. रणजीत तावडे, बाबा तावडे, अभिजीत तावडे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे, नगरसेवक प्रदीप रावराणे, भाजपा तालुका उपाध्यक्ष स्वप्निल खानविलकर, श्री सुतार व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *