उद्धव ठाकरे यांनी दादरच्या 80 वर्षे जुन्या हनुमान मंदिराला पाडण्याच्या नोटीसीवरून भाजपवर निशाणा साधला होता. आदित्य ठाकरे यांच्या महाआरतीपूर्वीच नोटीसला स्थगिती मिळाली. मंगलप्रभात लोढा यांनी मंदिरात आरती केली आणि मंदिर पाडले जाणार नाही, असे स्पष्ट केले. रेल्वेने दिलेल्या नोटीसवरून उद्धव ठाकरे आक्रमक झाले होते. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदमध्ये दादर हनुमान मंदिराचा मुद्दा उपस्थित केला होता. मंदिराला हटवण्याची नोटीस मिळाल्याने उद्धव ठाकरे हे चांगलेच आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले. आज आदित्य ठाकरे या दादरच्या हनुमान मंदिरात महाआरती करणार होते. आदित्य ठाकरे यांच्या महाआरतीच्या अगोदरच मंदिराला देण्यात आलेल्या नोटीसला स्थगिती देण्यात आलीये. हे मंदिर 80 वर्ष जुने असल्याचे सांगताना देखील उद्धव ठाकरे हे दिसले होते. मंगलप्रभात लोढा यांनी दादरच्या हनुमान मंदिरात आरती केलीये.
हनुमान मंदिराला हटवण्याची नोटीस मिळाल्याने भाजपावर निशाना साधताना उद्धव ठाकरे हे दिसले होते. मंगलप्रभास लोढा यांनी स्पष्ट केले की, मंदिरात पूजा सुरूच राहणार आहे. हनुमान मंदिराला मिळालेल्या नोटीसला स्थगिती मिळालीये. मंदिरात नित्यपूजा आणि आरती सुरूच राहणार. आदित्य ठाकरे हे आज मंदिरात येऊन महाआरती करणार होते. मात्र, आदित्य ठाकरे यांच्या अगोदर लोढा हे हनुमान मंदिरात दाखल झाले. मंदिर पाडले जाणार नसल्याचे देखील स्पष्ट मंगलप्रभात लोढा यांनी म्हटले. मंदिर हटवण्याला आता स्थगिती देण्यात आलीये. रेल्वेमंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर ही स्थगिती देण्यात आल्याची माहिती मिळतंय. आता याप्रकरणी आदित्य ठाकरे नेमकी काय भूमिका घेतात, हे देखील पाहण्यासारखे ठरणार आहे. आदित्य ठाकरे यांच्याकडून या मंदिरात संध्याकाळी आरती होणार होती. त्यापूर्वीच मंगलप्रभात लोढा यांनी आरती केली. दादरच्या या मंदिराला रेल्वेने नोटीस दिली होती. भाजपने ही नोटीस कुठून आणली? हे कसे हिंदुत्व?, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला होता. मध्य रेल्वेने डिसेंबरमध्ये मंदिराचे विश्वस्त आणि पुजारी यांना बजावलेल्या या नोटीसमध्ये बेकायदेशीर असल्याचे सांगत सात दिवसांत मंदिर हटविण्यास सांगितले होते. मंदिरामुळे तेथील वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून दादर स्थानकावर रेल्वेकडून सुरू असलेल्या विकासकामांनाही अडथळा निर्माण होत असल्याचे रेल्वेने नोटीसमध्ये म्हटले आहे. आता स्थगिती देण्यात आलीये. यावरून राजकारण रंगताना दिसत होते.