राहुल गांधी यांनी संसदेत सरकारवर टीका करत अदानीला मदत करण्याचा आरोप केला. त्यांनी उत्तर प्रदेशमधील अत्याचाराचा मुद्दा उपस्थित केला आणि भाजपवर संविधानावर हल्ला करण्याचा आरोप केला. राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे संसदेत गोंधळ उडाला. नुकताच हिवाळी अधिवेशनात संसदेमध्ये बोलताना राहुल गांधी यांनी सरकारवर जोरदार टीका केली. देशाच्या संविधानाबद्दल बोलताना राहुल गांधी हे दिसले आहेत. त्यांनी संविधानावर भाषण केले. राहुल गांधी म्हणाले, संविधान आमचा आधार आहे. यासोबतच त्यांनी सरकारवर गंभीर आरोप करत म्हटले की, सरकार अदानीला मदत करत आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबईच्या पत्रकार परिषदमध्ये राहुल गांधी यांनी एका तिजोरीमधून नरेंद्र मोदी आणि गाैतम अदानी यांचे फोटो काढले होते. भाजपा सर्वकाही अदानीला देत असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले होते.
आज परत संसदेत राहुल गांधी हे अदानीबद्दल बोलताना दिसत आहेत. अदानीच्या मुद्दावरून केंद्र सरकारला राहुल गांधी यांनी धारेवर धरले. यासोबतच्या त्यांनी म्हटले की, देशात दोन विचारांची लढाई सुरू आहे. यासोबतच उत्तर प्रदेशमध्ये संविधान लागू नाहीये, असेही म्हणताना राहुल गांधी दिसले. उत्तर प्रदेशमधील अत्याचाराचा मुद्दा राहुल गांधी यांनी संसदेत मांडला. पीडित मुलीचे कुटुंबिय घरात बंद असल्याचेही राहुल गांधी यांनी सांगितले. राहुल गांधी पुढे म्हणाले, सावरकर म्हणाले होते की, संविधानात भारतीय काहीही नाही. देशात शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला जातोय. भाजपाकडून रोज संविधानावर आक्रमण केले जात असल्याचा गंभीर आरोपही राहुल गांधी यांच्याकडून करण्यात आलाय. राहुल गांधींचे हे बोलणे ऐकल्यानंतर भाजपा खासदार आक्रमक होताना दिसले. संसदेत मोठा गोंधळ निर्माण झाला. राहुल गांधी म्हणाले, भाजपवाले 24 तास संविधानावर हल्ले करतात. भारतात दोन विचारांची लढाई सुरू आहे. संविधान आपल्या परंपरेची झलक असल्याचेही राहुल गांधी यांनी म्हटले. थेट भाजपवाले संविधानावर हल्ले करत असल्याचा उल्लेख राहुल गांधी यांच्याकडून करण्यात आला. राहुल गांधी यांच्या भाषणानंतर संसदेचे वातावरण चांगलेच तापल्याचे दिसतंय. भाजपाकडून संविधान बदलले जाणार असल्याचाही आरोपी काही दिवसांपूर्वी करण्यात आला होता. ज्यानंतर भाजपाकडून विरोधक खोटे बोलत असल्याचे सांगितले गेले.