येणाऱ्या पाच वर्षांमध्ये या तिन मंत्र्यांनी जळगाव जिल्ह्याचा विकास करावा बेरोजगार तरुण-तरुणंना रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी एमआयडीसीमध्ये मोठमोठे उद्योग आणून जिल्ह्याच्या विकासात भर घालावी हीच जळगाव जिल्हा वासियांची अपेक्षा आहे. अन्यथा या पाच वर्षात देखील जळगाव जिल्हाचा विकास न झाल्यास जिल्हा हा पुन्हा मागे टाकला जाईल हे मात्र निश्चित. जळगाव जिल्ह्यात कुणाला मंत्रीपद मिळणार आणि कुणाला दक्ष मिळणार याची अनेक दिवसांपासून चर्चा होती यात गिरीश महाजन यांना पक्षाची जबाबदारी दिली जाणार अशी देखील चर्चा होती. मात्र, या सर्व चर्चांना पूर्णविराम देत भाजपाचे गिरीश महाजन शिवसेनेचे गुलाबराव पाटील आणि राष्ट्रवादीचे अनिल पाटील या तिघांना जिल्ह्यातून पुन्हा एकदा राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे.
उत्तर महाराष्ट्राचा विचार केला असता जळगाव जिल्ह्यात अकरावी विधानसभा या निवडणुकीच्या आखाड्यात होत्या यात ११ च्या ११ जागांवरती महायुतीने आपला झेंडा गाळात मोठ्या मताधिक्यांनी जागा निवडून आल्या. यात प्रामुख्याने मंत्री गिरीश महाजन यांच्या मतदारसंघात सर्वात जास्त लढत ही राष्ट्रवादी दिलीप कोळपे यांनी दिली होती. अवघ्या २३ ते २४ हजारांच्या मतांनी गिरीश महाजन यांचा विजय संपादन झाला. जळगाव जिल्ह्यातील तिघे मंत्र्यांची निवडणूकमध्ये प्रतिष्ठा पणाला लागली होती. यात जामनेरमधून गिरीश महाजन यांच्या विरोधात दिलीप कोळपे जळगाव ग्रामीण मधून गुलाबराव पाटील यांच्या विरोधात गुलाबराव देवकर तर अनिल पाटील यांच्या विरोधात अपक्ष शरद चौधरी यांनी तिघमंत्र्यांना तगडे आव्हान दिले होते. त्यामुळे या चुरशीच्या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. मात्र, मुख्यमंत्री लाडक्या बहीण योजनेचा फायदा महायुतीच्या या उमेदवारांना झाल्यामुळे मोठ्या मताधिक्यांनी तिघही मंत्री दणदणीत विजय खेचत आपले वर्चस्व निर्माण केले.