संजय शिरसाट यांची राहुल गांधींवर टीका, म्हणाले, ‘ते’ परभणीला पक्षाचे धोरण म्हणून जात आहेत

नुकताच संजय शिरसाट यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. राहुल गांधी यांच्या परभणी दाैऱ्यावर टीका केलीये. विरोधकांना फक्त राजकारण करायचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आम्ही परभणी आणि बीडला जात असल्याचे सांगताना संजय शिरसाट हे दिसले आहेत. परभणीच्या हिंसाचारानंतर वातावरण तापले आहे. शरद पवार यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. हिंसाचारानंतर पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशी यांना अटक केली होती. यादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूनंतर गंभीर आरोप केले जात आहेत. शरद पवार हे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांच्या भेटीला गेले होते. त्यानंतर आज राहुल गांधी हे देखील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत. त्यावरून राजकारण हे तापताना दिसत आहे. महायुतीमधील प्रमुख नेतेही आज परभणीला जाणार आहेत. 
नुकताच राहुल गांधी यांच्या परभणी दाैऱ्याबद्दल बोलताना संजय शिरसाट हे म्हणाले की, परभणीच्या घटनेत राहुल गांधी कुटुंबियांना भेटायला जात आहे. राज्यघटनेची कशी विटंबना झाली?

हे सरकारला दाखवण्यासाठी विरोधक तिथे जात आहेत. त्यांना सूर्यवंशी कुटुंबाशी काही सहानुभूती नाही. हे फक्त राजकारणासाठी तिथे जात आहेत. आज आम्ही बीड आणि परभणीला जात आहोत.पुढे शिरसाट म्हणाले, आम्हाला जातीय सलोखा राखायचा आहे. जाती जातीत भांडण लावायची नाही. राहुल गांधी पक्षाचे धोरण म्हणून जात आहेत. आम्ही बीड, परभणीला माणुसकी म्हणून जात आहोत. बीड, परभणीमध्ये गेलो तर त्या ठिकाणी आम्ही वस्तुस्थितीची माहिती घेणार आहोत. त्यावरून त्यांना न्याय कसा देता येईल यासाठी प्रयत्न करणार आहे. तेथील एसपीकडून माहिती घेऊन त्याचा अहवाल मुख्यमंत्र्यांना देणार आहोत. परभणी येथील घटनेत एकाचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबियांना भेट देणार आहे त्या कुटुंबाला मदत कशी करता येईल? यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. विरोधकांना राजकारण फक्त करायचे आहे. एखाद्या व्यक्तीचा जीव गेला आहे. तिथे विरोधक राजकारण करत आहे. आम्हाला मात्र फक्त न्याय द्यायचा आहे, असेही संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. राहुल गांधी हे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांशी संवाद साधतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *