कमी कालावधीत परतावा देणारा शेअर सेबीच्या रडारवर, गुंतवणूकदारांना धक्का

आर्थिक गैरप्रकारामुळे बाजार नियामक सेबीने भारत ग्लोबल डेव्हलपर्समधील व्यापार स्थगित केला आहे. आर्थिक गैरसमजामुळे बाजार नियामक सेबीने भारत ग्लोबल डेव्हलपर्समधील व्यापार स्थगित केला ​असून कंपनीच्या संशयास्पद आर्थिक हालचालींबाबत सेबीकडे तक्रार आली  होती. या कंपनीने गेल्या ११ महिन्यांत गुंतवणूकदारांना ३३०० टक्क्यांहून अधिक परतावा दिला. एखादी कंपनी कमी कालावधीत गुंतवणूकदारांना बिनदिक्कत परतावा देत असेल तर, तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे. भांडवली बाजार नियामक सेबीने पुढील आदेशापर्यंत अशाच एका कंपनीच्या व्यापारावर बंदी घातली आहे. बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) ने पुढील आदेश येईपर्यंत भारत ग्लोबल डेव्हलपर्सच्या शेअर्सचे व्यवहार थांबवले असून आज, २३ डिसेंबर रोजी, बाजाराच्या ओपनिंग सत्रात भारत ग्लोबल डेव्हलपर्सचे समभाग ५% लोअर सर्किटवर घसरले आहेत. नियामकाने कंपनीच्या प्रवर्तकांना भांडवली बाजारात प्रवेश करण्यासही अनिश्चित काळासाठी बंदी घातली आहे.

सेबी (भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड) ने कंपनी आणि ४७ लोकांविरुद्ध नोटीस जारी केली आहे आणि या सर्वांना भारत ग्लोबल डेव्हलपर्स लिमिटेडच्या शेअर्समध्ये कोणत्याही प्रकारचे व्यवहार करण्यास बंदी घातली आहे. या कंपनीने ११ महिन्यांत ३३०० टक्क्यांहून अधिक परतावा दिला होता त्यानंतर, लोकांना काहीतरी संशयास्पद आढळले. याबाबत अनेक तक्रारी करण्यात आल्या आणि याआधारे सेबीने सध्या कंपनीचे ट्रेडिंग निलंबित केले आहे. कंपनीची आर्थिक स्थिती आणि व्यवसायाची चुकीची माहिती दिल्याच्या तक्रारी कंपनीविरुद्ध करण्यात आल्या. म्हणजे कंपनीचे आर्थिक व्यवहार संशयास्पद असल्याचे गुंतवणूकदारांना आढळले. कंपनीच्या आर्थिक स्टेटमेन्टमध्ये तिची खरी स्थिती चुकीची असल्याचे सेबीच्या तपासात आढळून आले आहे. विशेष म्हणजे भारत ग्लोबल डेव्हलपर्सने २०२३ मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षासाठी नगण्य महसूल, खर्च, स्थिर मालमत्ता आणि रोख प्रवाह नोंदवला मात्र मार्च २०२४ च्या तिमाहीतील आर्थिक निकालांमध्ये महसूल आणि खर्च या दोन्हींमध्ये तीव्र वाढ दिसून आली. प्राधान्य वाटपासाठी लॉक-इन संपण्याच्या एक दिवस आधी, ३० ऑक्टोबर रोजी कंपनीने सहा नवीन शाखा स्थापन करण्याची संशयास्पद घोषणा केली तर, कंपनीने अलीकडेच रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) कडून रु. १२० कोटी किमतीची स्पर्धा ऑर्डर जाहीर केली होती, जी आधी ‘चुकून’ रु. ३०० कोटींची ऑर्डर म्हणून नमूद केली होती.भारत ग्लोबल डेव्हलपर्सने बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिट जारी करण्याची घोषणा केली असून कंपनी अनुक्रमे 8:10 आणि 1:10 या प्रमाणात बोनस शेअर्स जारी करणार होती. या कॉर्पोरेट कारवाईसाठी कंपनीने गुरुवार, २६ डिसेंबर, रेकॉर्ड डेट निश्चित केली होती. मात्र, सेबीच्या आदेशानंतर ही कारवाईही थांबवण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *