प्रणिती शिंदेंचा एल्गार ! सकाळी सकाळी काँग्रेस कार्यकर्त्यांना सोबत घेऊन रस्त्यावर!

काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदें यांनी सोमवारी सकाळी सकाळी कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात आंदोलन केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा कॉंग्रेस विरोध करत आहे. आणि अशातच, काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदें यांनी सोमवारी सकाळी सकाळी कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात आंदोलन केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत केलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दलच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करत खा.प्रणिती शिंदेंनी सडकून टीका केली. सकाळीच सुरू केलेल्या या आंदोलनात हातात संविधानाची प्रत घेत ,”डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला स्वर्गच बनविले आहे. त्यांनी दिलेल्या संविधानाद्वारे आम्ही या देशात स्वर्ग निर्माण करू, पण भाजपचे स्वर्ग नकोय आम्हाला अशा शब्दांत खा.प्रणिती शिंदेंनी अमित शहांवर निशाणा साधला.

काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदें यांनी आरएसएस आणि भाजपला टार्गेट केले आहे. “भाजप आणि आरएसएसला यापूर्वी तिरंगा नको होता. तिरंगाला हे लोक अशुभ मानत होते. भाजपच्या नेत्यांनी संविधान बदलण्याची वक्तव्ये देखील अनेकदा केली आहेत. मागच्या निवडणुकीत भाजपने चारशे पारचा नारा दिला होता. जर खरोखरंच ह्यांचे चारशे खासदार निवडून आले असते तर त्यांनी संविधान बदलण्याचं कटकारस्थान केलं असतं” अशी प्रतिक्रिया खा. प्रणिती शिंदेंनी दिली. काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदें विधानसभा निवडणुकी नंतर पहिल्यांदाच माध्यमांसमोर आल्या आहेत. सोमवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना सोबत घेत डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढत लक्ष वेधून घेतले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालयात खा. प्रणिती शिंदें दाखल झाल्या. सदर बाजार पोलिसांनी या मोर्चा दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि आंदोलनाला हिंसक वळण लागु नये म्हणून खबरदारी घेत मोठा पोलीस बंदोबस्त जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तैनात केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *