अन्यथा पक्षातून हकालपट्टी करण्यात येईल; राहुल गांधी गुजरातमधील काँग्रेस नेत्यांवर का भडकले.

दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी शनिवारी काँग्रेस पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी अशा नेते, कार्यकर्त्यांची हकालपट्टी करण्यात येईल, असा इशारा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिला. ‘भाजपसाठी काम करणारे काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांना पक्षात कोणतेही स्थान नाही. असे नेते, कार्यकर्त्यांची हकालपट्टी करण्यात येईल,’ असा इशारा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी दिला.दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी शनिवारी काँग्रेस पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. ‘गुजरातमधील काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांची दोन गटांत विभागणी करायला हवी. काँग्रेसची विचारधारा हृदयात असलेले, जनतेत जाऊन काम करणारे नेते, कार्यकर्त्यांचा एक गट आणि जनतेपासून दुरावलेल्यांचा दुसरा गट.

या दुसऱ्या गटातील निम्मे तरी भाजपसाठी काम करतात’, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.‘गुजरात काँग्रेसमधील या दोन गटांना चाळणी लावावी लागेल. प्रसंगी हकालपट्टीसारखी कठोर कारवाई करावी लागेल. हे दोन गट वेगवेगळे केल्याशिवाय गुजरातची जनता काँग्रेसवर विश्वास ठेवणार नाही’, असे राहुल गांधी म्हणाले. राज्यातील पक्षसंघटनेत मोठे बदल करण्याचे संकेत देताना राहुल यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी यशस्वी रणनीती आखण्याची ग्वाही प्रदेश काँग्रेस नेत्यांना दिली.‘सत्ताधाऱ्यांमुळे गुजरातमधील जनतेची कोंडी झाली आहे. राज्यात हिरे, वस्त्रोद्योगाची वाताहत झाली आहे. शेतकऱ्यांची स्थितीही दयनीय झाली आहे. त्यांना नवी दिशा देण्याची गरज आहे. गेल्या २०-२५ वर्षांपासूनचे कृषी धोरण अपयशी ठरले आहे. काँग्रेस नवदिशा देऊन गुजरातला प्रगतिपथावर आणू शकते. मात्र, त्याआधी पक्षातील अकार्यक्षम, भाजपशी हातमिळवणी केलेल्या लोकांना घरचा रस्ता दाखवला पाहिजे’, असा इशारा राहुल गांधी यांनी दिला. ‘गुजरात नव्या मार्गाच्या शोधात आहे. प्रश्न निवडणुकीचा नाही, आपल्या जबाबदारीचा आहे. ही जबाबदारी पार पाडल्याशिवाय गुजरातची जनता आपल्याला सत्तेवर आणणार नाही.

त्यामुळे आपण जनहिताची जबाबदारी पार पाडली, तर राज्यातील जनता आपल्याला पाठबळ देईल, याची मला खात्री आहे,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.अखिल भारतीय काँग्रेस समितीचे अधिवेशन ८ आणि ९ एप्रिलला अहमदाबाद येथे होणार आहे. सुमारे ६४ वर्षांनी काँग्रेसचे अधिवेशन गुजरातमध्ये होणार आहे. या पार्श्वभूमीवर राहुल यांनी पक्षातील मरगळ झटकण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जाते.कर्नाटकमध्ये सत्ताधारी काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद सुरू असताना पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी शनिवारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना एकत्र काम करण्याची सूचना केली. राज्याच्या विकासाला प्राधान्य देण्याचे आवाहनही त्यांनी केले. ‘जर ते वेगळे राहिले आणि विविध दिशांना गेले तर कठीण होईल,’ असेही खर्गे म्हणाले. एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही लक्ष्य केले. ‘मोदी देशाशी खोटे बोलत आहेत. त्यांच्या ११ वर्षांच्या सत्तेत त्यांनी ११ वेळा मोठी खोटी वक्तव्ये केली आहेत,’ असा आरोप त्यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *