मांगलवाडी येथे मुर्खानंद स्वामी पुण्यतिथी सोहळा उत्साहात

मांगलवाडी येथे मुर्खानंद स्वामी पुण्यतिथी सोहळा उत्साहात

रावेर ता. प्रतिनिधी :-प्रदीप महाराज

खिर्डी येथून जवळच असलेल्या मांगलवाडी (ता.रावेर) येथे मुर्खानंद स्वामी पुण्यतिथी सोहळा रविवारी १९ रोजी पार पडला.यानिमित्त सकाळी स्वामींच्या पादुकांचा अभिषेक,महापूजा व सायंकाळी किर्तन सोहळा पार पडला.
यावेळी आयोजित किर्तन सोहळ्यात आईवडीलांचा हात जर आपल्या डोक्यावर फिरला तर त्यांच्या हातात एवढी ताकद आहे की उदया आयुष्यात कोणाकडेही अनुसरण करायची गरज पडत नाही.कमी जगावं पण चांगलं जगावं त्यालाच लोक आठवण करतात.जन्माला येण आणि मरणे याने इतिहास घडत नाही तर इतिहास हा चांगल्या जगण्याचा घडत असतो.आपल्या जीवनात अनुसरण असले पाहीजे.अनुसरे तो अमर झाला तोच अमर होत असतो अन्यथा कोणीही अमर होत नाही असे दिपक महाराज (निंभोरासीमकर) यांनी प्रतिपादन केले.कार्यक्रमास वढवे येथील भजनी मंडळींनी सहकार्य केले.या सोहळ्याला ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *