देवरे विद्यालयात आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी योगासनाचे घेतले धडे
विखरण आप्पासाो. आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालय विखरण येथे आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त विविध योगासने आणि प्राणायाम यांचे प्रात्यक्षिक व आजच्या धावपळीच्या जीवनात योगाचे महत्त्व विद्यार्थ्यांनी जाणून घेतले. योग प्रार्थना, दंड स्थितीतील आसने, बैठक स्थितीतील आसने,पोटावर झोपून-पाठीवर झोपून स्थितीतील आसने,हास्यासन, कपालभाती प्राणायाम, ध्यान,संकल्प,शांती पाठ या स्वरुपात विविध प्रात्यक्षिक कृती घेण्यात आली. मुख्याध्यापक डी. डी. साळुंके यांच्या उपस्थितीत क्रीडाशिक्षक के. पी. देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली कु. देवर्षी पाटील, चि.दिपेश लोहार यांनी योगासने सादर केली. विद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक डी. बी. भारती,एम.डी. नेरकर, वाय. डी. बागुल, एम. एस. मराठे, व्ही. बी.अहीरे,आर.आर. बागुल, एस. एच. गायकवाड, डी. . पाटील, एम. आर. भामरे, एस. जी. पाटील व पालक वृंदांनी संकल्प श्लोक घेत आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपला सहभाग नोंदविला.