यावल बस स्टॅन्ड त्वरित नव्याने उभारा यावल मनसेची मागणी.

यावल बस स्टॅन्ड त्वरित नव्याने उभारायावल मनसेची मागणीयावल प्रतिनिधीयावल बस स्थानक हे गेल्या आठ ते दहा वर्षापासून अतिशय बिकट अवस्थेत आहे ही अवस्था बदलून नवीन बस स्थानक तयार झाले पाहिजे त्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून यावल बस स्थानकाचे नूतनीकरण करण्यास लवकरात लवकर मंजुरी देण्यात यावी तसेच दररोज एसटी बसचा कुठे ना कुठे अपघात होत आहेत तरी काही ठिकाणी या एसटी बस रस्त्यात कुठेही बंद पडत आहेत. त्यात यावल बस आगारात किमान 80 ते 90 बसेस अपेक्षित आहेत पण प्रत्येक्षात केवळ 52 बस धावत आहे व उपलब्ध आहे.त्यात 40 बसेस ह्या नादुरुस्त अवस्थेत आहेत त्यात यावल आगारातील बसेस भंगार झाल्या असूनही त्या बिनधास्तपणे रस्त्यावर उतरविल्या जात आहेत. धोकादायक बसमध्ये प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे प्रवास करताना कधी काय होईल हे सांगता येत नाही. या प्रकाराकडे परिवहन विभागाचे विभागीय नियंत्रण अधिकारी पूर्णपणे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.सरकारने महिलांना तिकीट दरात सवलत दिल्याने एसटीला प्रवाशांची प्रचंड गर्दी दिसून येत आहे मात्र सध्या बहुतांश बसेस भंगार अवस्थेत आहेत. अशा भंगार बसेस मुळे वाहन चालक आणि वाहक यांचा नाईलाज बस चालवण्यासाठी होत आहे. हे यावरून स्पष्ट होत आहे राज्य सरकारने याकडे व जळगाव महामंडळ व्यवस्थापक व विभागीय नियंत्रण अधिकारी यांनी लक्ष देऊन यावल तालुक्यातील एसटी भंगार बसेस काढून टाकाव्यात आणि नवीन बसेस द्याव्यात अशी मागणी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या निवेदनाद्वारे करीत आहोत याची तात्काळ दखल घेण्यात यावी अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईलउपस्थित मनसे राज्य उपाध्यक्ष जनहित विद विभाग चेतन आढळकर जिल्हा संघटक राजेंद्र निकम उपजिल्हा संघटक साजन पाटील तालुकाध्यक्ष मुकेश बोरसे तालुका संघटक किशोर नन्नवरे शहराध्यक्ष गौरव कोळी शुभम चौधरी व इतर तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *