इकरा एचजे कॉलेज थीम मध्ये महिला आरोग्य संवर्धन अभियान.

इकरा एचजे कॉलेज थीम मध्ये महिला आरोग्य संवर्धन अभियानजळगाव प्रतिनिधी शाहिद खान जळगाव: इकरा शिक्षणं संस्था संचालीत एच जे थीम कला व विज्ञान महाविद्यालय जळगाव येथे महीला विद्यार्थी विकास विभाग द्वारे महिला आरोग्य संवर्धन अभियान राबविण्यात आला.या प्रसंगी वक्ता डॉ. पर्वणी मोहन लाड यांनी विद्यार्थिनींना मोलाचे मार्गदर्शन केले.स्त्री ही पुरूषांच्या बरोबरीने काम करते.परंतू आजही कुटुंबात व समाजात स्त्रीचे स्थान कनिष्ठ आहे पुरुष प्रधान समाज व्यवस्था, घरकाम, मुलांचे पालनपोषण, कुटुंबातील लोकांची निगा वृद्वांची सेवा एकूण सदैव कष्ट करणे सतत कामामुळे तीला आरोग्याच्या समस्या निर्माण होततत.स्त्रियांचा आरोग्यावर प्रतिकुल परिणाम होतो.त्याचा स्त्रीयांवर तसेच संपूर्ण कुटुंबावर परिणाम होतो. रक्तक्षय अ‍ॅनिमिया, कर्करोग, तसेच त्यांची आरोग्य स्थिती, प्रसुती याबाबत मोठया समस्या निर्माण होतात.त्यामुळे तिचा शारीरीक व मानसिकस्वास्थ्यावर परिणाम होतो.पाहुण्यांचा परिचय प्रा.डॉ.कैहकशा अंजुम यांनी केला.पाहुण्यांचे स्वागत डॉ.फिर्दौस शेख यांनी करून दिला.या कार्यक्रमाला प्रा डॉ कुलकर्णी, वरिष्ठ प्राध्यापिका देवकर यांची उपस्थिती होती.कार्यक्रमा चे सूत्रसंचालन विद्यार्थी विकास महिला अधिकारी प्रा डॉ शबाना खाटिक यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *