विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी कोळंबकरांची नियुक्ती. फडणवीसांकडे मोठी इच्छा व्यक्त.

भाजप आमदार कालिदास कोळंबकर यांची विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते आज दुपारी अध्यक्षपदाची शपथ घेतील. महायुती सरकारचा भव्यदिव्य असा शपथविधी सोहळा काल गुरुवारी पार पडला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर एकनथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित होते. मुख्यमंत्रिपदावर विराजमान होताच फडणवीसांनी कॅबिनेटच्या बैठकीत तीन दिवसांच्या विशेष अधिवेशनाची घोषणा केली. त्यापूर्वी भाजप आमदार कालिदास कोळंबकर यांची राज्याच्या विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभेच्या विशेष अधिवेशनासाठी कालिदास कोळंबकर हे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन हंगामी विधानसभा अध्यक्षपदाची शपथ ग्रहण करतील. दुपारी १ वाजता हा शपथग्रहण कार्यक्रम होणार आहे.

कालिदास कोळंबकर यांनी हंगामी विधानसभा अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. उद्यापासून सुरु होणाऱ्या तीन दिवसीय विशेष अधिवेशनासाठी त्यांची नियुक्ती करण्यात यणार आहे. त्यासाठी ते आज राजभवनात जाऊन शपथ ग्रहण करतील. दुपारी एक वाजता राजभवनात राज्यपाल सी पी राधाकृष्णन त्यांना शपथ देतील. त्यानंतर विशेष अधिवेशनात ते नवनिर्वाचित आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. उद्यापासून म्हणजेच ७ डिसेंबर ते १० डिसेंबरपर्यंत विधानसभचं विशेष अधिवेशन घेतलं जाणार आहे. कालिदास कोळंबकर हे भाजपचे आमदार आहेत. ते ९ वेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. तर आता त्यांची विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाकडून मला हंगामी अध्यक्ष म्हणून शपथ घेण्यास सांगण्यात आलं आहे. त्यानुसार, मी दुपारी एक वाजता हंगामी अध्यक्षपदाची शपथ ग्रहण करेल. देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले आहेत, इकते वर्ष झाले मी काम करतो आहे, आता जनतेत काम करण्याची संधी मला देतील, अशी इच्छा आहे. तशी इच्छा फडणवीसांकडे व्यक्त केल्याचं कालिदास कोळंबकर म्हणाले. 
शपथविधीनंतर फडणवीसांनी कॅबिनेट बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी ७ ते ९ डिसेंबरपर्यंत विधीमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावण्यात येणार असल्याची घोषणा केली. या विधीमंडळाच्या अधिवेशनात महायुतीच्या नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *