देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर एकनाथ खडसेंकडून दिलजमाईचे संकेत.

जळगावात एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या संबंधांवर भाष्य केले. फडणवीसांसोबतचे संबंध चांगले असल्याचे सांगत, खडसेंनी तात्विक मतभेद असले तरी ते भविष्यात मिटू शकतात, असे सूचित केले. महायुतीच्या यशावरही त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आणि लाडक्या बहिणी योजनेवरून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.

मुख्यंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर एकनाथ खडसे यांनी त्यांच्याबद्दल केलेलं विधान चर्चेत आलं आहे. एकनाथ खडसे यांच्या विधानामुळे त्यांच्याकडून फडणवीस यांच्यासोबत दिल जमाईचे संकेत दिले आहेत. ॉजळगावात पत्रकारांसोबत बोलत होते. देवेंद्र फडणवीस आणि मी सोबत काम केलं आहे. आमच्यात काही तात्विक मतभेद कालही होते आजही आहेत आणि उद्या ते मतभेद मिटही शकतात. देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझे संबंध चांगले, आम्ही आजही एकमेकांशी बोलतो, असं एकनाथ खडेस म्हणाले. 
महायुतीला एवढा घवघवीत यश मिळेल असं वाटलं नव्हतं. कारण महाराष्ट्राचे चित्र पाहिलं महागाईने उच्चांक गाठला आहे. शेतकऱ्यांचे शेतमालाला भाव नाही. बेरोजगारी कमी झाली नाही. 

अनेक विषय घेऊन आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही भूमिका मांडली. परंतु महायुतीच्या माध्यमातून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये साडेसात हजार त्यांनी तीन महिन्यात टाकले. ते साडेसात हजार महिलांच्या खात्यावर जमा झाले असून एक प्रकारे त्यांनी लाडक्या बहीणींकडून मत मिळवण्यासाठी महिलांना अप्रत्यक्षपणे त्यांनी लाच दिल्याचागंभीर आरोप माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी यावेळी केला. कुणाल रोहिदास पाटील यांच्याच गावात त्यांना शून्य मोठे त्यांना मिळाली आहे. कोणीतरी त्यांचा आधार असेल किंवा त्यांनी त्यांना मत देत असेल. मात्र, या ठिकाणी उमेदवाराच्या गावातच त्याला मत मिळालं नाही. जाणकारांनी याबाबतीत प्रश्न उपस्थित केला असून परत मतदान करा, मतदान परत हो दिलं असते, काय बिघडले असते, असा सवाल एकनाथ खडसेंनी उपस्थित केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझे संबंध चांगले आहेत. आम्ही एकमेकांशी बोलतो. मात्र सरकारचा विषय आला तर मी माझी भूमिका मांडतोच. व्यक्तिगत एकमेकांशी दुश्मनी नसते. राजकारणामध्ये मी अनेक वेळा भूमिका बदलली आहे. कधी मी भाजपमध्ये होतो, कधी राष्ट्रवादीमध्ये होतो. परत भाजपमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे व्यक्तिगत द्वेष नसतो. राजकीय जीवनामध्ये एकमेकांवर आरोप करताना व्यक्तिगत दोष नसतो. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत माझे तात्विक मतभेद होते ते आजही आहे. पण पुढच्या काळामध्ये तात्विक मतभेद मिटूही शकतील, असंही एकनाथ खडसे यांनी सांगितलं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *