भारतासाठी सर्वात मोठी डोकेदुखी ठरलेला ट्रॅव्हिस हेडला आऊट कसे करायचे.

ट्रॅव्हिस हेड गेल्या दोन वर्षांपासून टीम इंडियाचा सर्वात मोठा ‘शत्रू’ ठरत आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगने हेडला त्याला स्वत:ला बाद करण्याचे रहस्य विचारले. यावर ऑस्ट्रेलियन फलंदाजाने सडेतोड उत्तर दिले आहे. ट्रॅव्हिस हेड गेल्या दोन वर्षांपासून टीम इंडियाचा सर्वात मोठा ‘शत्रू’ ठरत आहे. हेडच्या शतकी खेळीमुळे भारतीय संघाला २०२३ च्या विश्वचषक आणि त्याच वर्षी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये ट्रॉफी गमवावी लागली होती. आता ब्रिस्बेन कसोटीतही त्याने १५२ धावांची खेळी करत भारताला विजयापासून दूर ढकलले. दरम्यान, भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगने हेडला त्याला स्वत:ला बाद करण्याचे रहस्य विचारले. यावर ऑस्ट्रेलियन फलंदाजाने सडेतोड उत्तर दिले आहे.

एका मुलाखतीदरम्यान हरभजन सिंगने ट्रॅव्हिस हेडला विचारले की, “संपूर्ण भारताला त्याच्याविरुद्ध गोलंदाजी कशी करायची या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यात रस आहे. हरभजनने असेही विचारले की, “त्याला टीम इंडियाविरुद्ध इतक्या धावा का आवडतात? “त्याला प्रत्युत्तर देताना हेडने सांगितले की, “आपण ज्या प्रकारे ब्रिस्बेन कसोटी खेळलो त्याचा मला अभिमान वाटतो.” ट्रॅव्हिस हेड म्हणाला, “मी हे याआधीही सांगितले आहे, आम्ही भारताविरुद्ध इतकं क्रिकेट खेळलो आहोत की आम्ही यशाची ब्लू प्रिंट तयार करू शकतो. माझ्या मते टीम इंडिया खूप चांगल्या नियोजनासह आली होती, मला खूप दिवसांपासून दडपण जाणवत होते. मी ज्याप्रकारे दबावाखाली लहान चेंडूंविरुद्ध खेळलो त्यामुळे मी खूप खूश आहे.”

ट्रॅव्हिस हेडनेही रवींद्र जडेजाचे उंच उसळणारे फिरकी चेंडू चांगले खेळता आल्याबद्दल आनंद व्यक्त केला. तो म्हणाला, “माझी रणनीती पुन्हा एकदा यशस्वी झाली. जेव्हा मला आणखी एक संधी मिळेल, तेव्हा मी पुन्हा नव्याने सुरुवात करू इच्छितो.” या मालिकेत ट्रॅव्हिस हेडने भारताविरुद्धच्या कसोटी क्रिकेटमध्ये १००० धावा पूर्ण केल्या आहेत. सध्याच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्येही त्याने दोन शतके आणि एक अर्धशतक झळकावले आहे. भारताकडून जसप्रीत बुमराहने अप्रतिम गोलंदाजी करत पहिल्या डावात सहा विकेट काढल्या. सहा विकेट काढताच त्याने ऑस्ट्रेलियन भूमीवर विकेटच्या बाबतीत ५०चा आकडा गाठला आहे. विकेटच्या बाबतीत अर्धशतक करणारा तो दुसरा गोलंदाज ठरला तर प्रथम कपिल देव आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *