नेरी येथील हॉटेल मोहिनी येथे होते प्रत्येक ग्राहकांची दहा रुपयांनी लूट!

नेरी (प्रतिनिधी):- जळगाव ते छत्रपती संभाजी नगर या महामार्गावरील नेरी येथील सुप्रसिद्ध हॉटेल मोहिनी येथे ग्राहकांची प्रत्येक बिलामागे 10 रुपयांनी होते लूट तेथील मॅनेजर ग्राहकांशी वाढीव बिलात संदर्भात बोलले असता. तेथील कर्मचारी तसेच वेटर ग्राहकाशी वाद घालून  त्यांना मारहाण  करून ग्राहकांना हाकलून लावत असतात. ग्राहकांशी भांडण झाल्यानंतर त्यांच्याकडून जास्तीचे बिल आकारून आपली हॉटेल सुरू आहे.जर या विषयावरती कोणी ग्राहक त्यांना विचारणा केला असतात तेथील मॅनेजर व वेटर  हेच  स्वतःला मॅनेजर समजून घेत असतात आणि ग्राहकांनी त्यांना वाढीव दराबद्दल बोलले असता ते ग्राहकांना मारहाण करून तेथून हाकलून  लावतात तसेच ग्राहक हे दारू पीत असल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करीत असतात असेच आमच्या प्रतिनिधींनी या संदर्भात खुलासा केला असता तेथे जाऊन खरे आणि खोटे काय हे बघितले असता त्या संदर्भात पाहिल्यानंतर त्यांनाही असेच अनुभयास मिळाले आहे. यानंतर त्यांच्याकडे चार ते पाच बिल घेतल्यानंतर त्या बिलामध्ये तफावत आढळल्याने त्यांनी वेटरना विचारले केले असता वेटरने बरोबर घेतलेल्या बिलाची आणि मालाची माहिती बरोबर सांगितल्याने जेव्हा मॅनेजर यांना विचारणा केली असता वेटरला काय समजते या संदर्भात बोलणे केले आणि वेटरलाच बोलून संबंधित ग्राहकाला अरेरावीची भाषा आणि मारहाण करीत तेथून हाकलून दिले.संदर्भित ग्राहक  हे पत्रकार असताना त्यांनी सांगितल्यानंतर त्यांना मारहाण आणि तेथील वेटर यांनी त्यांना हाकलून लावले यासंदर्भात ग्राहक असलेले पत्रकार हे जेव्हा नेरी दूरक्षेत्र असलेले पोलीस स्टेशन येथे पोहोचले असता नेरी दूरक्षेत्र हे त्यांना बंद आढळून आले. रात्रीची वेळ असताना  जेव्हा पत्रकार पोलीस स्टेशन येथे पोहोचता  पोलीस स्टेशन नेरी येथील दूर शेत्र हे बंद आढळून आले यावेळी कुणाकडे  तक्रार करावी अशा संभ्रमात पत्रकार हे पडलेले आहेत. जेव्हा मोठा गुन्हा होईल किंवा चोरी होईल त्यावेळेस संबंधित व्यक्ती कोणाकडे जाईल हाही प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे. नागरिकांकडून या घटनेची तसेच नेरी दुरक्षेत्र हे जामनेर पोलिस स्टेशन अतंर्गत येत असल्याने जामनेर  पोलीस स्टेशनचे  कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक किरण शिंदे याकडे लक्ष देतील का ? तसेच नेरीहे बाजार पेठ चे गाव असून आणि छं.संभाजीनगर आणि जळगाव या महामार्गावर वसलेले असताना येथे अनेक मोठ्या प्रमाणात गुन्हे होऊ शकतात यासर्व गोष्टी लक्षात घेऊन नेरी दुरक्षेत्र रात्रीच्या वेळी सुरू राहील की नाही अशी चर्चा  नागरिकांमध्ये सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *