IPLमध्ये करोडोंची बोली लागलेला १३ वर्षांचा वैभव मैदानात उतरणार. भारत-पाकिस्तान आमने-सामने.

भारत-पाकिस्तान अंडर १९ आशिया कप क्रिकेट सामना दुबईमध्ये ३० नोव्हेंबरला होणार आहे. या सामन्याकडे लक्ष असण्याचं आणखी एक कारण म्हणजे आयपीएलमध्ये करोडोची बोली लागलेल्या १३ वर्षांच्या खेळाडू वैभव सुर्यवंशीचे पदार्पण आहे. भारत आणि पाकिस्तानसोबत बांगलादेश आणि अफगाणिस्तानचा संघही स्पर्धेत सहभागी आहे. भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सामना म्हटलं की प्रेक्षकांसाठी पर्वणी असते. या हायव्होल्टेज सामन्याची क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. आज अंडर-१९ आशिया कपमध्ये दोन्ही तगडे संघ एकमेकांना भिडणार आहेत. ही स्पर्धा दुबईमध्ये खेळवली जात असून आजच्या सामन्याकडे लक्ष असण्याचं आणखी एक कारण म्हणजे १३ वर्षांचा खेळाडू वैभव सुर्यवंशी ज्याला आयपीएल लिलावामध्ये करोडोंची बोली लागली होती. आयपीएलच्या इतिहासात सर्वात कमी वयाच्या खेळाडूला लागलेली ही विक्रमी बोली ठरली होती. वैभव सुर्यवंशी भारतीय संघामध्ये खेळत असून त्याच्याकडे सर्वांना नजरा लागलेल्या असणार आहेत.

 अंडर १९ आशिया कपमध्ये भारताचा पहिला सामना पाकिस्तान संघासोबत होणार आहे. यंदा आशिया कप ५० ओव्हर्सचा असणार असून भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान संघांचा सहभाग असणार आहे. अंडर १९ आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तानमधील सामना दुबईमध्ये ३० नोव्हेंबर १०.३० वाजता सुरू होणार आहे. या सामन्याचे प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स चॅनेल्सवर पाहू शकता. या सामन्यामध्ये भारतीय संघातील वैभव सुर्यवंशी याचा हा पहिला आशिया कप असून तो पदार्पण करणार आहे. अंडर १९ आशिया कपमध्ये 30 नोव्हेंबर पाकिस्तान, 2 डिसेंबर जपान, 4 डिसेंबर यूएई या संघांसोबत सामना होणार आहे. आशिया कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ अ गटात आहेत. वैभव सुर्यवंशी हा बिहारचा असून आयपीएल लिलावामध्ये राजस्थान रॉयल्स संघाने त्याला १ कोटी १० लाख रूपयांना खरेदी केले होते. आतापर्यंत वैभवची कामगिरी पाहिली तर ५ 5 प्रथम श्रेणी सामने आणि एक टी-२० सामना खेळला आहे. यंदाच्या वर्षी २०२४ मध्येच त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. १० डावांमध्ये त्याने १०० धावा केल्या असून त्यामध्ये ४१ त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. तक एका टी-२० सामन्यामध्ये त्याने १३ धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये त्याला बोली लागल्यावर त्याच्या वयावरून मोठा वाद निर्माण झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *