समोर येईल त्याला उडवत सात जणांचा जीव घेणाऱ्या कुर्ला बेस्ट बस अपघातात आता नवं कारण चर्चेत

 कुर्ला येथे बेस्ट बसच्या अपघातात आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४९ जण जखमी असल्याची माहिती आहे. या अपघातातील बस चालक संजय मोरेला पोलिसांनी अटक केली आहे. कुर्ल्यातील बेस्ट बस अपघाताने संपूर्ण मुंबईला हादरवून सोडलं आहे. सोमवारी रात्री बेस्टच्या या इलेक्ट्रिक बसने अनेकांना चिरडलं. या घटनेत आपर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे तर ४८ जण जखमी असल्याची माहिती आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयता उपचार सुरु आहेत. तर, मृतांचा आकडा वाढण्याचीही भीती व्यक्त करण्यात येत आहे.

सोमवारी रात्रीच्या सुमारास ३३२ क्रमांकाची ही बस कुर्ल्याहून अंधेरीच्या दिशेनेकडे निघाली होती. वाटेत कुर्ला एलबीएस मार्गावरील मार्केटच्या दिशेने वळली. यावेळी या बसने भरधाव वेगात येत समोर येईल त्याला उडवलं. यावेळी या बसने ८-१० वाहनांना धडक दिली. रस्त्यावर चालणाऱ्या, उभ्या असलेल्या अनेकांनी चिरडलं, ज्यामध्ये तिघांनी जागी जीव सोडला, तर इतर चौघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चालक संजय मोरेला अटक केली आहे. सुरुवातीला बसला ब्रेक फेल झाल्याने अपघात झाल्याचं सांगितलं गेलं. तसेच, संजय मोरेने मद्यप्राशन केल्याचंही सांगण्यात आलं. मात्र, संजय मोरेने मद्यप्राशन केलं नव्हतं. तसेच, बसमध्येही कुठला तांत्रिक बिघाड नसल्याचं तपासात समोर आलं आहे. त्यामुळे सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. लॉकडाऊननंतर संजय मोरे हा बेस्टमध्ये कंत्राटी वाहनचालक म्हणून कामाला लागला. तेव्हापासून ती लहान बस चालवायचा. त्यानंतर नुकतंच त्याला मोठी इलेक्ट्रिक बस चालवायला देण्यात आली होती. त्यापूर्वी त्याला १० दिवसांचं ट्रेनिंगही देण्यात आलं होतं. मात्र, अपुरा अनुभव आणि माहिती असलेल्या संजय मोरेच्या हाती थेट इलेक्ट्रिक बसचं पॉवर स्टेअरिंग देण्यात आलं. कदाचित हेच या अपघाताचं सर्वात मोठं कारण ठरलं, असं बोललं जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *