सुशिक्षित तरुणांना नोकरीचे आमिष, वाहनचालकच बनला बोगस आयुक्त, लाखोंचा गंडा;

आयकर अधिकारी असल्याचा बनाव करून चालक असलेल्या एका तोतया आयकर अधिकाऱ्याने बेरोजगार तरुण-तरुणींना नोकरीचे आमिष देऊन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.आयकर अधिकारी असल्याचा बनाव करून चालक असलेल्या एका तोतया आयकर अधिकाऱ्याने बेरोजगार तरुण-तरुणींना नोकरीचे आमिष देऊन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या तोतया अधिकाऱ्याने अनेक तरुण तरुणींकडून पैसे उकळून दोन कोटींपेक्षा अधिकची फसवणूक केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपी तोतया आयकर अधिकाऱ्याकडे तब्बल २८ बोगस ओळखपत्र मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या तोतया अधिकाऱ्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.तोतया अधिकाऱ्याचे नाव रिंकू शर्मा असून त्याने नालासोपारा येथील एका तरुणीला आयकर विभागात नोकरी देण्याचे अमिष दाखवत १५ लाख रुपये घेतले.

नंतर तरुणीला आयकर विभागाच्या आयकर निरीक्षक पदाचे बनावट ओळखपत्र व नियुक्तीपत्र देखील दिले. मात्र एक अनेक दिवस उलटले तरीही नोकरीवर रुजू होण्याबाबत कोणत्याही प्रकारचा फोन अथवा आदेश न मिळाला नाही. तसेच आपण दिलेले पैसे परत न मिळत नसल्याने तरुणीला आपली फसवणूक झाल्याचा संशय आला. यानंतर तरुणीने पेल्हार पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तोतया अधिकाऱ्याच्या विरोधात तक्रार दाखल केली. याप्रकरणी दोन आरोपींविरोधात पेल्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तोतया आयकर अधिकाऱ्याने केलेल्या फसवणुकीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष ३ ने या गुन्ह्याचा तपास केला आहे. तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपी रिंकू शर्मा (वय 30) याला नवी मुंबईतील तळोजा परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याची कसून चौकशी केली असता त्याच्याकडे २८ विविध बनावटींची ओळखपत्रे आढळून आली आहेत. आयकर विभागाचे सहाय्यक आयुक्त, आयकर निरीक्षक, गृह विभागाचे सहाय्यक आयुक्त, सीबीआय विभागाचे पोलीस आयुक्त अशा बनावट ओळखपत्रांचा यात समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.आयकर विभागात सहाय्यक आयुक्त आयकर निरीक्षक या पदावर नोकरी लावून देण्याचे अमिष दाखवून तब्बल 40 हून अधिक बेरोजगार तरुण-तरुणींची सुमारे दोन कोटींहून अधिकची फसवणूक या आरोपीने केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणातील आरोपी तोतया आयकर अधिकारी आयकर विभागात कंत्राटी पध्दतीने वाहन चालक म्हणून कार्यरत असल्याचे कळते. त्याचे शिक्षण फक्त शर्मा सहावीपर्यंत झालेले असून आयकर विभागातच चालक म्हणून आयकर विभागाती सर्व कामांची माहिती होती. आयकर विभागाचे काम कशाप्रकारे चालते, विभागातील अधिकाऱ्यांची पदे आदींसह सर्व कार्यालयीन कामकाजाची माहिती या आरोपीला होती. त्याचाच फायदा घेत त्याने आयकर विभागातील सर्व कागदपत्रे मिळवली होती व स्वतःचे देखील आयकर अधिकारी असल्याचे बनावट ओळखपत्र तयार केले होते. इंग्रजी भाषा हा तोताय अधकारी उत्कृष्टरित्या बोलत असल्याने कोणालाही तो अधिकारी नाही असा संशय आला नाही. बेरोजगार तरुण तरुणींना भेटताना तो अंबर दिवा असलेली गाडी आणि सुट घालून येत होता. त्यामुळे त्याच्या बोलण्यावर लोकांचा विश्वास बसत होता. आरोपी रिंकू शर्मा याला पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणाचा अधिक तपास पेल्हार पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *