इथे येऊन वेगळीच ऊर्जा मिळते, गडकिल्ल्यांसाठी… किल्ले शिवनेरीवरुन शिंदेंचं शिवभक्तांना मोठं आश्वासन.

 छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवर कार्यक्रम झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी हजेरी लावली. यावेळी शिवभक्त देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकनाथ शिंदे यांनी यावेळी आपल्या भाषणाच्या वेळी मोठे आश्वासन शिवभक्तांना दिले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त किल्ले शिवनेरी येथे कार्यक्रम  पार पडलाय. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार  हे किल्ले शिवनेरी येथे पोहोचले. यावेळी बोलताना एकनाथ शिंदे हे म्हणाले की, ज्यावेळी या गडकिल्ल्यांवर येतो, त्यावेळी एक वेगळी ऊर्जा आणि प्रेरणा मिळते.

शिवाजी महाराजांचे किल्ले फक्त पाहण्यासाठीच नाही तर त्यामुळे त्यांचा आणि मावळांचा पराक्रम देखील दिसतो. देश विदेशात या गडकिल्ल्यांची लोकप्रियता आहे.शिंदे पुढे म्हणाले की, शिवाजी महाराजांसारखा  दुसरा कुठलाच आदर्श असू शकत नाही. किल्ले आणि जुनी मंदिरे संवर्धन आम्ही सुरू केले. याठिकाणी येणाऱ्या शिवभक्तांना सुविधा मिळाल्या पाहिजेत. कालच उद्योगमंत्री आणि पर्यटन मंत्र्यांना सांगितले, एक टीम तयार करा आणि गडकिल्ल्यांचं सर्किट तयार करा त्याठिकाणी सर्व सुविधा द्या. मी अगोदर मुख्यमंत्री होतो आणि आता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत आणि आम्ही सर्वजण टीम म्हणून या राज्याचा आणि किल्ल्यांचा विकास करू.युनेस्कोकडे शिवनेरीचाही प्रस्ताव दिल्याचेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. युनेस्कोकडे राज्यातील 11 किल्ल्यांचा प्रस्ताव देण्यात आलाय. शिंदे म्हणाले, काही दिवसांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईमध्ये तीन युद्धनाैकांचे राष्ट्रअर्पण केले. त्यावेळी मोदींनी  अभिमानाने उल्लेख केला, ही देखील आपल्यासाठी फार अभिमानाची गोष्ट आहे.आज संध्याकाळी कश्मीर आणि आग्राला देखीलशिवाजी महाराजांच्या जयंती साजरी होतंय. मी देखील दोन वर्ष तिथे गेलो, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तिथे उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर लंडन, रशिया, जपान विदेशातही शिवाजी महाराजांचे जयंती साजरी होतंय. गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची जोरदार चर्चा ही रंगताना दिसतंय. आज देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे एकाच मंचावर आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *