राम मंदिराच्या विरोधात असलेले महाकुंभाची बदनामी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यांना बिहारमधील जनता कधीही माफ करणार नाही, असा विश्वास मला आहे,’ असे मोदी म्हणाले. महाकुंभमेळ्याबाबत टिप्पणीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यापाठोपाठ राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांना लक्ष्य केले. ‘हिंदू धर्माची खिल्ली उडवणाऱ्या ‘जंगलराज’च्या नेत्यांना बिहारची जनता कधीही माफ करणार नाही,’ […]