सत्तास्थापनेचा दावा न केल्याने आदित्य ठाकरेंचा टोला.हा तर ‘लाडक्या’ आयोगाचा अपमान.

हा केवळ महाराष्ट्राचा नव्हे; तर त्यांच्या ‘लाडक्या’ निवडणूक आयोगाने केलेल्या सहकार्याचाही अपमान आहे’, अशी टीका ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी रविवारी केली.  ‘मुख्यमंत्री कोण होणार हे निश्चित झालेले नाही. निकालाला एक आठवडा उलटून गेल्यानंतरही सरकार स्थापन झालेले नाही. हा केवळ महाराष्ट्राचा नव्हे; तर त्यांच्या ‘लाडक्या’ निवडणूक आयोगाने केलेल्या सहकार्याचाही अपमान आहे’, अशी टीका ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी रविवारी केली. ‘नियम केवळ विरोधी पक्षांना लागू असतात असे वाटते. काही विशेष लोकांना ते लागू नाहीत,’ असेही त्यांनी म्हटले आहे.

महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर एक आठवडा लोटला तरी राज्यात सत्ता स्थापन झालेली नाही. मुख्यमंत्री कोण होणार, याची औपचारिक घोषणा झालेली नाही. यावरूनच आदित्य यांनी ‘एक्स’च्या माध्यमातून महायुतीला लक्ष्य केले. ‘राज्यात सरकार स्थापनेचा दावा न करता, राज्यपालांकडे बहुमत न सादर करता शपथविधीची तारीख जाहीर करणे हे अराजक आहे,’ अशी टीका ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी रविवारी केली. तसेच, ‘या सर्वांदरम्यान चंद्रकलेनुसार काळजीवाहू मुख्यमंत्री छोट्या सुट्टीवर निघून जातात. हे आपण यापूर्वीही पाहिले आहे,’ असा चिमटाही त्यांनी शिंदे यांना उद्देशून काढला.

‘जे सरकार स्थापन करू शकतात, त्यांच्या प्राधान्यक्रमावर महाराष्ट्र आहे असे वाटत नाही. ते सध्या दिल्लीदौऱ्यांचा आनंद घेताना दिसत आहेत. विरोधकांकडे संख्याबळ असते आणि निर्णय लांबत असता तर आतापर्यंत राष्ट्रपती राजवट लागू झाली नसती का,’ असा प्रश्न आदित्य यांनी केला आहे. ‘असो, निवडणूक आयोगाच्या सहकार्यामुळे जो कोणी शपथ घेईल, त्याचे आमच्याकडून अभिनंदन!’, असा टोला त्यांनी पोस्टच्या शेवटी लगावला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *