एकनाथ शिंदेंनी सारं सांगितलं. मीच देवेंद्र फडणवीसांचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी सुचवलं होतं.

एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी अनेक बाबींवर भाष्य केलं.

महायुतीचा अत्यंत भव्य असा शपथविधी सोहळा मुंबईच्या आझाद मैदानात पार पडला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या सोहळ्यानंतर हे तिघे मंत्र्यालयात आले, तिथे कॅबिनेटची बैठक पार पडली आणि त्यानंतर पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या अडीच वर्षाच्या कामाबद्दल भाष्य केलं. ही आमच्या कामकाजाची पोचपावती आहे, म्हणून असा अभूतपूर्व विजय मिळवला, असं ते म्हणाले. तसेच, महाराष्ट्राने आज एक ऐतिसाहिक असा शपथविधी पाहिला, असंही शिंदे म्हणाले. 
अडीच वर्ष जे कामकाज केलं त्या कामाची पोचपावती जनता दिल्याशिवाय राहणार नाही याची खात्री होती, तसंच झालं. मी नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मनापासून अभिनंदन करतो. गेल्या अडीच वर्षात मी मुख्यमंत्री असताना फडणवीस आणि अजित पवारांनी सहकार्य केलं, म्हणून मी कालही सांगितलं होतं की अडीच वर्षांपूर्वी फडणवीसांनी माझं नाव मुख्यमंत्री म्हणून सुचवलं होतं, मी यावेळी त्यांचं नाव मुख्यमंत्री म्हणून सुचवलं. एक टीम म्हणून आम्ही काम केलं याचं समाधान आहे. फडणवीसांच्या गेल्या मुख्यमंत्रिपदाचा अनुभव गेल्या अडीच वर्षात कामी आला. त्यामुळे मनापासून त्यांना शुभेच्छा देतो. यापूर्वीही मी उघडपणे पत्रकार परिषद घेत त्यांना जाहीर पाठिंबा दिला होता. नरेंद्र मोदी आणि अमित शहा जो निर्णय घेतील त्याला शिवसेना आणि माझा पाठिंबा दर्शवला होता. हे सरकार यशस्वी, गतिवान सरकार ठरलं. या सरकारची कारकिर्द यशस्वी ठरली. भूतोनभविष्यती असं बहुमत आम्हाला मिळालं. ते यामुळेच कारण आम्ही जनतेत जाऊन काम केलं आधी आम्ही ४० आमदार होतो आता ६० झालो आहे. ही देखील कामाची पोचपावती आहे, याचा अभिमान आणि समाधान मला आहे. आमच्यासाठी सत्ता ही साध्य नसून जनसेवेचं साधन आहे, अशा प्रकारचं काम आम्ही केलं. मला काय मिळालं यापेक्षा जनतेला काय मिळालं, पुझे काय. मिळणार ही भावना मनात ठेवून कामकेलं, सरकार स्थापन केलं 
गेल्या अडीच वर्षाची कारकिर्द यशस्वी झाली, मी सीएम म्हणजे नेमही स्वत: कॉमन मॅन समजायचो, मी सामान्य कार्यकर्ता म्हणूनच काम केलं. आता मी डीसीएम आहे, आता मी डेडिकेट टू कॉमन मॅन आहे, असं शिंदेंनी स्पष्ट केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *