गोवा बुक ऑफ इंडिया ही संस्था गेली अनेक वर्ष विविध भागातील विलोभनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा व संस्थांचा सन्मान सोहळा आयोजित करून त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्याचे काम संस्था करते. तसेच समाजात सतत काम करून आपल्या कार्याची माहिती इतरांना व्हावी या उद्देशाने नंदुरबार येथील लोय डोंगरपाडा या अंगणवाडीची अंगणवाडी सेविका बबीता रोशन पाडवी यांना नुकताच गोवा पणजी येथे माझी केंद्रीय कायदामंत्री रमाकांत खलप यांच्या शुभहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी जलसंपदा मंत्री सुभाष शिरोडकर, माजी शालेय शिक्षण मंत्री प्रकाश वेळीप, आमदार रॉडल फर्नांडिस, ज्येष्ठ साहित्यिक व लेखक पद्मश्री विनायक खेडेकर ,ज्येष्ठ संगीतकार गझल अजय नाईक, सुप्रसिद्ध उद्योगपती हेमंत कोळंबकर, दिनेश उघडे आदी मान्यवर उपस्थित होते तसेच या कार्यक्रमाचे आयोजक गोवा बूक रेकॉर्डचे अध्यक्ष प्रा. डॉ. बी एन खरात तसेच सुनील शेठ एकनाथ नार्वेकर यांच्या उपस्थित संपन्न झाला.
बबीता रोशन पाडवी ही अनेक वर्ष सामाजिक, क्रीडा शैक्षणिक कार्यात अग्रेसर आहे अंगणवाडीच्या माध्यमातून कुपोषित मुक्त जिल्हा कसा होईल या साठी प्रयत्न त्या करीत आहेत समाजातील निराधार महिला कुपोषित बालके किशोरी मुली यांना ते मार्गदर्शन करीत असतात कोरोना काळापासून मुक्ती मिळावी. या कालावधीत सुद्धा त्यांनी गावात प्रबोधन आणि जनजागृती चे काम केलेले आहे. त्या खेळपटू सुद्धा म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या या कार्यासाठी हा पुरस्कार देण्यात आला त्यामुळे सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.