शिक्षकांनी मध्यान्ह भोजनात विद्यार्थ्यांना आठवड्यातून एकदा ‘इडली-सांबर’ची मेजवानी सुरू केली

शासनाकडून दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या धान्यातूनच इडली सांबर बनविले जाते. इडली बनविण्यासाठी लागणारे भांडे मुख्याध्यापक अशोक वाडेकर यांनी स्वत:च्या पैशाने विकत आणले. शैक्षणिक गुणवत्तेसाठी शिक्षकही मेहनत घेत आहेत. अशा उपक्रमामुळे पालक समाधानी असल्याची प्रतिक्रिया पालक काशीराम वाघमारे यांनी व्यक्त केली. मध्यान्ह भोजनात काही तरी वेगळा पदार्थ खायला दिल्यास विद्यार्थ्यांची शिक्षणाविषयी गोडी वाढेल आणि ते अभ्यास करतील, या हेतूने आठवड्यातून एकदा इडली-सांबर देण्याचा निर्णय घेण्यात आला. या शाळेची विद्यार्थी संख्या २१४ आहे. एकीकडे पटसंख्या घटू लागल्याने जिल्हा परिषद शाळांचे अस्तित्व धोक्यात आले आहे, तर दुसरीकडे काही उपक्रमशील शिक्षकांनी गुणवत्ता वाढीसाठी दर्जेदार शिक्षण देऊन मुलांना घडविण्याचा आटापिटा चालविला आहे. विद्यार्थ्यांची रोज शंभर टक्के उपस्थिती असावी, याकरिता खामगाव तालुक्यातील बोरी आडगावच्या  शिक्षकांनी मध्यान्ह भोजनात विद्यार्थ्यांना आठवड्यातून एकदा ‘इडली-सांबर’ची मेजवानी सुरू केली आहे.

शिक्षणाची गोडी लागावी, मुले शिकून मोठे व्हावे, विविध क्षेत्रात त्यांनी शाळेसोबतच गावाचा नावलौकिक वाढवावा, हा या मागचा उद्देश असल्याने आपण हा उपक्रम सुरू केल्याचे शिक्षक सांगतात. पोषण आहारात हा नावीन्यपूर्ण मेनू मिळत असल्याने विद्यार्थीदेखील न चुकता शाळेला हजर राहात असल्याचे सुखद चित्र या शाळेत पाहायला मिळत आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये योग्य शिक्षण मिळत नाही, अशी ओरड पालक करतात. यामुळेच इंग्रजी माध्यमांच्या कॉन्व्हेंटकडे मुलांना प्रवेश देण्याकडे अनेक पालकांचा ओढा दिसून येतो. परिणामी जिल्हा परिषद शाळांमधील पटसंख्येवर परिणाम होत आहे. शाळेमध्ये गुणवत्ता वाढीसाठी शासनाकडून विविध योजना राबविल्या जातात. मध्यान्ह भोजनात काही तरी वेगळा पदार्थ खायला दिल्यास विद्यार्थ्यांची शिक्षणाविषयी गोडी वाढेल आणि ते अभ्यास करतील, या हेतूने आठवड्यातून एकदा इडली-सांबर देण्याचा निर्णय घेण्यात आला. या शाळेची विद्यार्थी संख्या २१४ आहे. शासनाकडून दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या धान्यातूनच इडली सांबर बनविले जाते. इडली बनविण्यासाठी लागणारे भांडे मुख्याध्यापक अशोक वाडेकर यांनी स्वत:च्या पैशाने विकत आणले. शैक्षणिक गुणवत्तेसाठी शिक्षकही मेहनत घेत आहेत. अशा उपक्रमामुळे पालक समाधानी असल्याची प्रतिक्रिया पालक काशीराम वाघमारे यांनी व्यक्त केली.शासनाकडून एक दिवस दप्तरमुक्त अभियान’ राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत शिक्षकांनी हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविला आहे. जिल्ह्यातील अन्य शाळांनीसुद्धा असा उपक्रम राबविल्यास निश्चितच तो फायदेशीर ठरेल. – बाळासाहेब खरात शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *