वर्षानुवर्षांची ‘पायपीट’ संपणार, मलंगगडावर ‘फनिक्युलर ट्रेन’धावणार

गेल्या ११ वर्षांपासून मलंगगडावर फ्युनिक्युलर ट्रेनचे काम सुरू आहे. त्याची चाचणी आणि सुरक्षा उपायांची तपासणी पूर्ण झाली असून सार्वजनिक बांधकाम विभाग येत्या २५ किंवा २६ जानेवारीला ही सेवा सुरू करू शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे. नवीन वर्षात मलंगगड किंवा हाजी मलंग टेकडीवर जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. येथे पोहोचण्यासाठी फ्युनिक्युलर ट्रेनचे सुरू असलेले काम आता पूर्ण झाले असून या महिन्यात ही ट्रेन सुरू होण्याची शक्यता आहे. गेल्या ११ वर्षांपासून मलंगगडावर फ्युनिक्युलर ट्रेनचे काम सुरू आहे. त्याची चाचणी आणि सुरक्षा उपायांची तपासणी पूर्ण झाली असून सार्वजनिक बांधकाम विभाग येत्या २५ किंवा २६ जानेवारीला ही सेवा सुरू करू शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे. हिंदू आणि मुस्लिम समुदायाची धार्मिक स्थळे मलंगगड टेकडीवर असल्याने देशभरातून लोक येथे दर्शनासाठी येतात. याशिवाय ठाणे, मुंबई आणि नवी मुंबईतील निसर्गप्रेमींमध्येही या टेकडीचे खास आकर्षण आहे. सध्या, टेकडीवर जाण्यासाठी, लोकांना २,६०० पायऱ्या चढाव्या लागतात, ज्यासाठी २ तासांपेक्षा जास्त वेळ लागतो. फ्युनिक्युलर ट्रेन सुरू झाल्यानंतर १० मिनिटांत डोंगरावर पोहोचता येईल. फ्युनिक्युलर ट्रेनच्या या सुविधेमुळे ज्येष्ठ नागरिक, अपंग आणि लहान मुलांना मोठा दिलासा मिळणार आहे.

अप आणि डाउन अशा दोन मार्गांवर दोन फ्युनिक्युलर धावणार असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली.
प्रत्येकी १२० लोक बसण्याची क्षमता असलेली ही दोन डब्यांची फ्युनिक्युलर ट्रेन असेल. ठाणे विभागातील एका वरिष्ठ PWD अधिकाऱ्याने सांगितले की, फ्युनिक्युलर ट्रेनच्या मार्गांचे काम पूर्ण झाले आहे. आणि सुरक्षा उपायांसह सर्व चाचण्या देखील पूर्ण झाल्या आहेत. २५ किंवा २६ जानेवारीला उद्घाटन करण्याचा आमचा विचार आहे.मलंगगडावर शेकडो लोक राहतात, जे गेस्ट रूम, रेस्टॉरंट चालवतात आणि येणाऱ्या भाविकांना हार-फुले विकतात. येथे येणाऱ्या भाविकांव्यतिरिक्त तिथे राहणाऱ्या लोकांना चरितार्थासाठी वस्तू खरेदी करण्यासाठी शहरात येताना कमी त्रास होणार आहे. ‘मला खात्री आहे की फ्युनिक्युलर सुरू झाल्याने येथे पर्यटन वाढेल आणि जे लोक पायऱ्या चढण्याच्या भीतीने येथे येत नाहीत तेही येतील.’ असे मलंगगडावर फुलांचा व्यवसाय करणाऱ्या फिरोज खान यांनी सांगितले.फ्युनिक्युलर चालवण्यासाठी आणि देखभाल करण्यासाठी सुमारे ७० कर्मचारी.  मलंगगड टेकडी १.२ किमी लांबीच्या दुतर्फा ट्रॅकसाठी कापण्यात आली आहे. फेब्रुवारी २०१३ मध्ये त्याची पायाभरणी झाली आणि ऑक्टोबर २०१३ मध्ये PWD ने ठेकेदाराकडून काम सुरू केले. मार्च २०१५ मध्ये ही ट्रेन सुरू होणार होती, परंतु तांत्रिक कारणांमुळे आणि इतर समस्यांमुळे हे काम अनेकवेळा पुढे ढकलण्यात आले.  त्यामुळे कामाचा खर्च १०.४२ कोटींवरून ९३ कोटींवर गेला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *