भाजपचा मंत्री ‘ॲक्शन मोडवर’! कार्यभाग स्वीकारल्यानंतर शंभर दिवसांत सगळ्या योजनांना गती

बुधवारी मंत्री अतुल सावे यांनी आपल्या पदाचा कार्यभाग स्वीकारल्यानंतर, तिनही विभागांची बैठक घेऊन शंभर दिवसांत सगळ्या योजनांना गती दिली जाईल असं सांगत, मंत्री अतुल सावे कार्यभार स्वीकारताच ॲक्शन मोडवर आले आहेत.बुधवारी मंत्री अतुल सावे यांनी आपल्या पदाचा कार्यभाग स्वीकारल्यानंतर, तिनही विभागांची बैठक घेऊन शंभर दिवसांत सगळ्या योजनांना गती दिली जाईल असं सांगत, मंत्री अतुल सावे कार्यभार स्वीकारताच ॲक्शन मोडवर आले आहेत. राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, अपारंपरिक उर्जा तसेच दुग्धविकास विभागाचे मंत्री म्हणून अतुल सावे यांनी आज पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारताच तिनही विभागाच्या बैठका घेऊन योजनांची माहिती घेतली. पुढील १०० दिवसांत सर्व योजनांना गती देण्याचा प्रयत्न करणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.मंत्री अतुल सावे यांनी प्रथम मंत्रालय परिसरातील महापुरूषांच्या प्रतिमेस अभिवादन केले. संविधान फलकाचे पूजन करून श्री. सावे यांनी मंत्रलायातील पाचव्या मजल्यावर पदभार स्वीकारला. यावेळी विविध विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.

यानंतर तत्काळ अपारंपरिक विभागाचा आढावा घेतला. विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती घेतली व योजनांची पूर्तता करण्यासाठी सूचना केल्या. पुढील शंभर दिवसांत या योजनांना गती देण्यात येईल, असे मंत्री श्री.सावे म्हणाले. यावेळी ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला व विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामगिरीचं कौतुककाही नक्षलीस्ट सरेंडर झाले आहेत त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करत कौतुक केल आहे. यावर बोलताना सावे म्हणाले “हो नक्कीच ही मोठी गोष्ट आहे. त्यांनी काल सरेंडर होत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाची प्रत हातात घेऊन वंदन केले. नक्कीच आणखी काही नक्षलवादी सरेंडर होतील” असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामगिरीचं त्यांनी कौतुक केलं “काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी छगन भुजबळ यांना वापरून घेतल्याचा आरोप केला आहे” यावर बोलताना अतुल सावे म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व एकनाथ शिंदे हे योग्य ते स्थान छगन भुजबळ यांना नक्कीच देतील. असा विश्वास त्यांनी व्यक्त करत वडेट्टीवार यांच्या टीकेला आपण फार महत्व देत नसल्याचे म्हटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *