‘किंग’ संपला? सिडनीतही विराटची हाराकिरी सुरूच, अशी हालत होण्याची 7 वी वेळ

सामन्यात विराट कोहलीच्या विकेटवरुन गदारोळ झाला. विराट कोहलीला अगदी डावाच्या पहिल्या चेंडूवर आऊट आजाल असता परंतु तो कॅच स्मिथने नीट पकडला नसल्याने विराटला जीवनदान मिळाले. भारताने पाचव्या कसोटीचे नाणेफेक जिंकले आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताच्या फलंदाजाना जास्त वेळ खेळपट्टीवर घालवता आला नाही. सामन्यात विराट कोहलीच्या विकेटवरुन गदारोळ झाला. विराट कोहलीला अगदी डावाच्या पहिल्या चेंडूवर आऊट असता परंतु तो कॅच स्मिथने नीट पकडला नसल्याने विराटला जीवनदान मिळाले. या जीवदानानंतर विराट कोहली बराच वेळ विकेटवर राहिला. दिवसाच्या पहिल्या सत्राचा खेळही पुढे ढकलण्यात आला. पण, खेळाच्या दुसऱ्या सत्रात तो त्याच गोलंदाजाचा बळी ठरला ज्याच्या चेंडूवर त्याला संधी मिळाली. त्यामुळे सिडनी कसोटीत मोठी खेळी खेळण्याच्या त्याच्या आशा धुळीस मिळाल्या आणि टीम इंडियावर संकटांचा डोंगर कोसळला.

सिडनी कसोटीच्या पहिल्या डावात विराट कोहलीने ६९ चेंडूंचा सामना केला, मात्र त्यावर तो केवळ १७ धावा करू शकला. विराटची विकेट स्कॉट बोलँडने घेतली. बोलंडच्या चेंडूवर विराटचा झेल तिसऱ्या स्लिपमध्ये या कसोटीत पदार्पण करणाऱ्या ऑस्ट्रेलियन खेळाडू ब्यू वेबस्टरने पकडला. अशाप्रकारे, शून्यावर जीवदान दिल्यानंतर विराटला त्याच्या स्कोअरमध्ये केवळ १७ धावांची भर घालता आली. सिडनी कसोटीत विराट कोहली ज्या पद्धतीने बाद झाला, तो प्रकार बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये पहिल्यांदाच पाहायला मिळाला नाही. खरं तर, विराट आतापर्यंत त्याच्या ८ डावांपैकी ७ वेळा अशा प्रकारे बाद झाला आहे. किंबहुना, सिडनीमध्येही तो बाहेर जात असलेल्या चेंडूवर स्लिपमध्ये झेलला गेला, जो त्याच्या आऊट होण्याच्या पद्धतींमध्ये सामान्य होता.रोहित शर्मा सिडनी कसोटीत खेळत नव्हता. अशा परिस्थितीत संघाचा सर्वात वरिष्ठ खेळाडू म्हणून विराटकडून अपेक्षा होत्या पण ती आशा धुळीस मिळाली. विराट कोहलीने गिलसोबत तिसऱ्या विकेटसाठी ४० धावांची भागीदारी केली पण वैयक्तिकरित्या तो फार मोठे योगदान देऊ शकला नाही. विराट कोहलीनेही आपली विकेट गमावून टीम इंडियाला अडचणीत टाकले आहे. तो बाद झाला तेव्हा संघाची धावसंख्या ४ विकेटवर केवळ ७२ धावा होती, ही चिंताजनक स्थिती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *