विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे उत्पन्न ५३ कोटी; गेल्या वर्षभरात सव्वा कोटी भाविकांनी घेतलं दर्शन

भाविकांकडून विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीस वर्षभरात ५३ कोटी ९७ लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले, अशी माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.  दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पंढरपुरात गेल्या वर्षात श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी १ कोटी २५ लाख भाविक आल्याची नोंद झाली आहे. या भाविकांकडून विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीस वर्षभरात ५३ कोटी ९७ लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले, अशी माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.

या दानामध्ये श्रींच्या चरणाजवळ सहा कोटी २५ लाख ८९ हजार ७९७ रुपये, लाडू प्रसादामधून पाच कोटी ८५ लाख २६ हजार ९०० रुपये, देणगीच्या माध्यमामधून आठ कोटी १८ लाख ९८ हजार ४१७ रुपये, भक्त निवासामधून नऊ कोटी ८४ लाख ७८ हजार २७९ रुपये, पूजेमधून दोन कोटी ३३ लाख ८६ हजार ३१२ रुपये, फोटो, मोबाइल अनामत, लॉकरभाडे व महावस्त्र विक्री यातून ९२ लाख ३३ हजार ४९ रुपये, हुंडी पेटीमधून सात कोटी ५६ लाख ७४ हजार ५२ रुपये, दान सोने-चांदीचे मूल्य दोन कोटी ७२ लाख ४ हजार ४५०, परिवार देवता मंदिरांमधून तीन कोटी नऊ लाख १४ हजार २०३, विधी उपचारांमधून ५९ लाख ८८ हजार ४३७ तसेच इतर जमेमधून सहा कोटी ५८ लाख ११ हजार ८५६ असे एकूण ५३ कोटी ९७ लाख ५ हजार ७५२ रुपयाचे उत्पन्न मिळाले आहे, अशी माहिती मंदिर समितीतर्फे देण्यात आली.मंदिर समितीला वारकरी भाविकांकडून चांगले दान मिळत आहे. मिळालेल्या दानामधून श्रींच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकरी भाविकांना चांगल्या व अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचा मंदिर समितीचा प्रयत्न राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *