परळी, बीडला ‘त्यांनी’ बदनाम केले; पंकजा मुंडे यांची धस यांच्यावर नाव न घेता टीका

अशा घटना थांबवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, या घटनांवर राजकारण करायला नको. मात्र, परळी, बीडला सध्या बदनाम केलं जात आहे, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी सुरेश धस यांच्यावर टीका केली.सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घृण हत्या झाली. या प्रकरणी एसआयटी नेमावी यासाठी मी सर्वप्रथम पत्र दिले होते, असे प्रतिपादन राज्याच्या पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी शनिवारी येथे केले.परळीचे गुन्हेगारीकरण झाल्याचे वक्तव्य आमदार सुरेश धस यांनी केले होते. तसेच, संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मंत्री पंकजा मुंडे गप्प का, असा प्रश्नही धस यांनी केला होता. या वक्तव्यांना पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी प्रत्युत्तर दिले.‘गुन्हेगारीच्या घटना विविध जिल्ह्यांमध्ये घडत आहेत. अशा घटना थांबण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. या घटनांवर राजकारण होता कामा नये. मात्र, परळी, बीडलाच बदनाम केले जात आहे. आज जे काही बोलत आहेत, ते दोन वर्षे आधी का बोलले नाहीत,’ असा प्रश्नही मुंडे यांनी आमदार धस यांचे नाव न घेता उपस्थित केला.‘या हत्या प्रकरणाकडे राजकीय भूमिका न घेता संवेदशनीलपणे बघितले असते तर असे झाले नसते. मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणत असतील की शोध लागत नाही तोपर्यंत कारवाई करणार नाही, तर त्यावर मी भाष्य करणार नाही. शोध लागेपर्यंत कारवाई करणार नसतील तर त्यावर मी काय बोलणार,’ असेही पंकजा म्हणाल्या.

परळीचे गुन्हेगारीकरण झाल्याचे वक्तव्य आमदार सुरेश धस यांनी केले होते. तसेच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मंत्री पंकजा मुंडे गप्प का, असा सवाल धस यांनी केला होता. या वक्तव्यांना पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रत्युत्तर दिले. ‘सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घृण हत्या झाली. या प्रकरणी एसआयटी नियुक्ती करा, याबाबत सर्वप्रथम पत्र दिले होते, असे त्यांनी सांगितले. गुन्हेगारीच्या घटना विविध जिल्ह्यांमध्ये घडत आहेत. अशा घटना थांबण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. या घटनांवर राजकारण होता कामा नये. मात्र परळी, बीडलाच बदनाम केले जात आहे. आज जे काही बोलत आहेत, त्यांनी दोन वर्षे आधी का बोलले नाहीत,’ असा सवालही मुंडे यांनी आमदार धस यांचे नाव न घेता केला.प्रदुषण व पशुसंवर्धन विभागाच्या बैठकीनिमित्ताने मंत्री पकंजा मुंडे शहरात आल्या होत्या. त्या वेळी त्या म्हणाल्या, ‘बीडच्या घटनेवरुन राजकारण केले जात आहे, का असे विचारले असता त्यांनी निर्घृण हत्या होते, जेव्हा घटना होते. ज्यांना यात राजकारण करायचे आहे, त्यांच्यासाठी तो मंच आहे. धस यांचे नाव न घेता मंत्री मुंडे यांनी ‘त्यांच्यामुळेच परळी, बीड बदनाम झाली,’ असा आरोप केला. ‘धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणत असतील की शोध लागत नाही तोवर कारवाई करणार नाही. त्यावर काऊंटर करणार नाही. शोध लागेपर्यंत कारवाई करणार नसतील तर त्यावर काय बोलणार,’ असेही त्या म्हणाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *