‘तो’ विषय संपला! छगन भुजबळांबाबत कृषिमंत्री कोकाटेंची नरमाईची भूमिका

माझ्या दृष्टीने त्यांचा विषय संपला आहे, अशी प्रतिक्रिया कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी भुजबळांसदर्भात सुरू असलेल्या वादावर व्यक्त केली आहे.

 राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री छगन भुजबळांच्या प्रत्येक प्रश्नाला माझ्याकडे उत्तर आहे. पण, कलगीतुरा नको. भुजबळांबाबत भाष्य करू नये असा पक्षाकडून मला आदेश आला आहे. त्यांच्याबाबतीत वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल. माझ्या दृष्टीने त्यांचा विषय संपला आहे, अशी प्रतिक्रिया कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी भुजबळांसदर्भात सुरू असलेल्या वादावर व्यक्त केली आहे. दरम्यान, राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी संदर्भात दोन प्रवाह असून, त्याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री निर्णय घेतील असे स्पष्टीकरणही कोकाटे यांनी  राज्याच्या मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळ नाराज असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर त्यांनी टीकास्र सोडले होते. त्यावरून कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि छगन भुजबळ यांच्यात गेल्या काही दिवसांपासून कलगीतुरा सुरू आहे. कोकाटे यांनी भुजबळांना थेट लक्ष्य केल्यामुळे पक्षात वादही निर्माण झाले होते. परंतु, शनिवारी (दि. ११) नाशिकमध्ये माध्यमांशी बोलताना कोकाटे यांनी भुजबळांबाबत नरमाईची भूमिका घेतल्याचे चित्र आहे. पक्षाकडून मला भुजबळांबाबत भाष्य करू नये, असा संदेश असल्याने माझ्याकडून भुजबळांचा विषय संपल्याचे सांगत, भुजबळांसोबत सुरू असलेल्या वादात त्यांनी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

आगामी निवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे गट स्वबळावर लढणार असल्याचे खासदार संजय राऊत यांनी जाहीर केले. यावरून माणिकराव कोकाटे यांनी ठाकरे गटाला टोला लगावलाय. त्यांनी म्हटले की, तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी काय करावे, कुणासोबत लढावे, उघडे लढावे की कपडे घालून, तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांना जे योग्य वाटते आहे त्यांनी ते करावे, असे कोकाटे म्हणाले. मंत्री धनजंय मुंडेंबाबत निर्णय घेण्यास मुख्यमंत्री सक्षम असल्याचेही कोकाटे म्हणाले.कृषी विभागात अनास्था असून, समन्वयाचाही अभाव असल्याची कबुली कोकाटे यांनी दिली. अनेक विभाग हे कृषी विभागात काम करीत असतात, तर शेतकऱ्यांसाठीच्या योजना तळागाळापर्यंत पोहचवायला पाहिजे, किती लाभार्थी झाले आहेत, असा अहवाल येत नाही तोपर्यंत बोलता येणार नाही, असे सांगत केंद्र सरकारसोबत समन्वय साधून मार्ग काढू, असेही कोकाटे म्हणाले. तसेच द्राक्षाबागा नुकसानीचा अहवाल मागविल्याचे मंत्री कोकाटेंनी सांगितले.महायुती सरकाकडून शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन देण्यात आले आहे. माझ्या अखत्यारीत कर्जमाफीचा विषय येत नसतो. राज्याच्या आर्थिक धोरणाबाबत मुख्यमंत्री, अर्थमंत्री घेतात असे सांगत, कर्जमाफीबाबत दोन मतप्रवाह असल्याचे कोकाटे यांनी स्पष्ट केले. नियमित कर्ज भरणारे आणि थकित कर्ज भरणारे असे दोन प्रवाह असून, कर्जमाफीमुळे नियमीत कर्जफेड करणाऱ्यांची पंचाईत होते. त्यामुळे याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होईल आणि त्यानंतरच अंतिम निर्णय होईल असे कोकाटे यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *