भारतीय फलंदाजाला मोठा खुलासा; दोन वेळा मृत्यूला हरवलं; त्रिशतक ठोकूनही संघातून बाहेरच.

भारतीय क्रिकेट संघाकडून खेळलेला करुण नायर सध्या चर्चेत आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये करुण सध्या धुमाकूळ घालत आहे. नायर आठ वर्षांनंतर टीम इंडियात पुनरागमन करू शकतो. करुण नायरचे कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक आहे. मात्र, त्यानंतर लगेचच त्याला कसोटी संघातून वगळण्यात आले, त्यानंतर तो अद्यापपर्यंत पुनरागमन करू शकलेला नाही. आता करुणने एक मोठा खुलासा केला आहे. भारतीय क्रिकेट संघाकडून खेळलेला करुण नायर सध्या चर्चेत आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये करुण सध्या धुमाकूळ घालत आहे. नायरने ५० षटकांच्या या स्पर्धेत आतापर्यंत पाच शतके झळकावली आहेत. आता त्याचा संघ गुरुवारी उपांत्य फेरीत महाराष्ट्रासमोर आहे. याशिवाय बीसीसीआयही करुण नायरवर नजर ठेवून असल्याचे वृत्त आहे. नायर निवडकर्त्यांच्या रडारवर आहे. अशा परिस्थितीत नायर आठ वर्षांनंतर टीम इंडियात पुनरागमन करू शकतो. करुण नायरचे कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक आहे.

मात्र, त्यानंतर लगेचच त्याला कसोटी संघातून वगळण्यात आले, त्यानंतर तो अद्यापपर्यंत पुनरागमन करू शकलेला नाही. आता करुणने एक मोठा खुलासा केला आहे.टीम इंडियाला या वर्षी जूनमध्ये पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर जायचे आहे. नायरचा फॉर्म असाच सुरू राहिल्यास तो इंग्लंडचे विमान पकडू शकतो. भारतीय खेळाडूला काऊंटीचाही अनुभव आहे. इंग्लंडमध्ये गेल्यानंतर त्याने कांउटीमध्येही शतक झळकवले आहे. करुणने काऊंटी क्रिकेटचा अनुभव सांगितला. तो म्हणाला, “हा खरोखरच एक अद्भुत अनुभव होता. इंग्लंडमध्ये खेळणे सोपे नाही. २०१८ मध्ये मी भारत अ साठी काही सामने खेळले आणि मी चांगली कामगिरी केली.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *