राज ठाकरे आणि उदय सामंत यांच्यात सव्वातास चर्चा, भेटीचे कारण पुढे, सामंत म्हणाले…

मंत्री उदय सामंत यांनी नुकतीच राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. यामुळे आता विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चा आहे की, एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे हे एकत्र येऊ शकतात. आता याबद्दल बोलताना उदय सामंत हे दिसले आहेत. यासोबतच त्यांनी भेटीमध्ये काय चर्चा झाली, याबद्दल खुलासा केलाय.नुकताच मंत्री उदय सामंत यांनी राज ठाकरे यांची भेट घेतलीये. उदय सामंत हे राज ठाकरे यांच्या भेटीला गेल्याने विविध चर्चा या राजकीय वर्तुळात रंगताना दिसत आहेत. या भेटीचे फोटो देखील पुढे आले. याबद्दल बोलताना उदय सामंत यांनी म्हटले की, मराठी साहित्य संमेलनाबाबत राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली. या भेटीमध्ये कोणत्याही प्रकारची राजकीय चर्चा झाली नाही ही अतिशय साधी आणि सिंपल भेट होती.

राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली आणि गप्पा मारल्या की, आणखीन काही गोष्टी कळतात. ही राजकीय भेट नव्हती.राज ठाकरे साहेब हे असे व्यक्तीमहत्व आहे की, राजकारणाच्या पलिकडे जाऊन आपण त्यांच्याशी गप्पा मारल्या तरीही आपल्या ज्ञानात भर पडते. विश्वमराठी संमेलनाला स्वत: राज ठाकरे उपस्थित होते आणि त्यांचे आभार मानण्यासाठी मी आलो होतो. अमित शहा यांच्यासोबत एकनाथ शिंदे साहेबांची जी बैठक ती राज्यातील विकासकामांबद्दल आहे. केंद्रातून राज्यात निधी कसा जास्तीत जास्त आणायचा आणि अमित शहा यांच्या हस्ते वीस लाख लोकांना घरे देण्याचा उपक्रम आहे.उदय सामंत पुढे म्हणाले की, बाकी खासगी भेटीत काय चर्चा झाली हे मला माहिती नाही. पालकमंत्रिपदाचा तिढा दोन ते तीन दिवसांमध्ये सुटेल. मराठी भाषा आणि मराठी उद्योजकांवर अन्याय होऊ देणार नाही. कोकाटे यांच्या राजीनाम्याबद्दल बोलताना उदय सामंत म्हणाले की, या गोष्टीची संपूर्ण माहिती घेतल्यावरच बोलणे योग्य राहिल. नितेश राणे यांनी केलेले वक्तव्य कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी केले असावे. नितेश राणे हे दुवाभाव करणार नाहीत अशी खात्री आहे.संतोष देशमुख हत्या प्रकरणाबद्दल बोलताना उदय सामंत म्हणाले की, एकनाथ शिंदे साहेब आणि आमची भूमिका याबद्दल स्पष्ट आहे की, कोणत्याही परिस्थितीत मारेकऱ्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे आणि ते फाशावर चढले पाहिजेत, हीच आमच्या सर्वांची भूमिका आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा विषय वेगळा आहे. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे एकत्र येणार असल्याच्या चर्चा आहेत. यावर बोलताना उदय सामंत म्हणाले की, याबद्दल राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे चर्चा करतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *