मुंबई : राज्यातील शेतकरी, नागरिक यांना नैसर्गिक आपत्ती, शेती नुकसान भरपाईसाठीच्या मदतीचे वाटप 30 जून पर्यंत पूर्ण करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी दिले. खते, बियाणे यांचा काळा बाजार करणार्या विक्रेत्यांबरोबरच कंपन्यावरही कडक कारवाई करण्याच्या सूचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी कृषी विभागाला दिल्या. सह्याद्री अतिथी गृह येथे झालेल्या बैठकीत राज्यातील खरीप हंगामाचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. […]