इंजिन फेल झाल्याने कोणार्क एक्सप्रेस दोन तास स्थानकातच थांबली, प्रवाशांचा खोळंबा.

कोणार्क एक्सप्रेसचे इंजिन फेल झाल्याने रेल्वे पुणे रेल्वे स्थानकावर खोळंबली आहे. गेले दोन तासांपासून रेल्वे प्लॅटफॉर्मवर उभी आहे. परिणामी प्रवाशांचाही खोळंबा झाला आहे. कोणार्क एक्सप्रेसचे इंजिन फेल झाल्याने रेल्वे भिगवण स्थानकावर खोळंबल्याची बातमी समोर आली आहे. गेले दोन तासांपासून रेल्वे प्लॅटफॉर्मवर उभी होती. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ओडिसातील भुवनेश्वरला जाणारी ११०१९ ही रेल्वे तांत्रिक बिघाडामुळे खोळंबली. परिणामी रेल्वेतील प्रवासी त्रस्त झाले. तर याचा अन्य रेल्वे सेवालाही फटका बसला आहे.

वंदे भारतसह लांब पल्ल्याच्या इतर रेल्वेंचे वेळापत्रक खोळंबले आहे. यामुळे पुण्याहून येणाऱ्या सगळ्या रेल्वे एक तास उशिरा धावत असल्याची माहिती आहे.दरम्यान, याबाबत रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. परंतु कोणार्क एक्सप्रेसचे काही प्रवासी सध्या हैदराबाद एक्सप्रेसने पुढील प्रवासासाठी निघाले आहेत आणि आपले गंतव्यस्थान गाठणार आहेत.सोमवारी दुपारी लखनऊ-लोकमान्य लोकमान्य टिळक टर्मिनस ही एसी सुपरस्टार रेल्वे दीड तास इगतपुरी स्थानकात थांबली होती. प्रवाशांचे म्हणणे आहे की, रेल्वेने ही ट्रेन विनाकारण उभी करून ठेवली होती. यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला आणि परिणामी प्रवासी चांगलेच संतापले होते.

दरम्यान, ही रेल्वे वगळता अन्य सर्व रेल्वेगाड्या वेळेनुसार सोडल्याने प्रवाशांना संताप अनावर झाला. यामुळे संतप्त प्रवाशांनी तडक स्टेशन प्रबंधकांचे कार्यालय गाठले आणि त्यांना जाब विचारला. यामुळे स्थानकात गोंधळाची स्थिती निर्माण झाली.यातच रेल्वे खोळंबल्याचे कोणतेही अधिकृत कारण प्रशासनाने जाहीर न केल्याने प्रवाशांचा रागाचा पारा आणखी चढला. या सर्व नाट्यानंतर अखेर पावणे दोन तासांनी गाडी इगतपुरी स्थानकातून रवाना तर झाली. पण पुढे काही अंतरावर ती पुन्हा थांबली. यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. या संपू्र्ण प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून संताप व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *