पोलीस निरीक्षक पवार यांनी मारहाण केल्याच्या निषेधार्थ या तारखेला मनसे पदाधिकारी उपोषणास बसणार ! अनिल वाघ

दिनांक 16 जून रोजी पाचोरा येथील शरह सचिव कृष्णा दुंदुले यास तेथील पोलीस निरीक्षक पवार यांनी अर्वाच भाषेत शिवीगाळ व मारहाण केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जिल्हाभरामध्ये या संदर्भात संताप व्यक्त करून सन्मा.पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन संबंधित अधिकारी याच्यावर कायदेशीर कारवाई करून जिल्ह्यातील अवेद्यधंदे तात्काळ बंद करण्यासंदर्भात निवेदन दिले आहे परंतु आज पर्यंत संबंधित अधिकाऱ्यावर कुठलीही ठोस कायदेशीर कारवाई करण्यात आलेली नाही,

दिनांक 26 जून रोजी पाचोरा येथे पीडित पदाधिकारी व तेथील कार्यकर्ते उपोषणास बसणार आहेत तरी जिल्ह्यातील पदाधिकारी व अंगीकृत संघटनेचे कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात येते की त्यांनी दिनांक 26 जून रोजी मोठ्या संख्येने पाचोरा येथे सकाळी ठीक 10 वाजता एकत्र यावे

असे आव्हान जिल्हा अध्यक्ष, आनिल वाघ यांनी केले आहे ! मनसे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *