सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी संदीप क्षीरसागर यांचे गंभीर आरोप, उद्या बीडमध्ये सर्वपक्षीय …

 बीडमध्ये मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ उद्या सर्वपक्षीय नेत्यांचा मूक मोर्चा निघणार आहे. हत्येनंतर 18 दिवस झाले तरी आरोपींना अटक नाही. आमदार संदीप क्षीरसागर यांनी यावेळी काही गंभीर आरोप देखील केले आहेत. केजच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आता 18 दिवस पूर्ण झाली आहेत. अजूनही सर्व आरोपींना अटक करण्यात आली नाहीये. याप्रकरणात सतत गंभीर आरोप हे केले जात आहेत. त्यामध्येच आता संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी उद्या बीडमध्ये सर्वपक्षीय नेत्यांचा मूक मोर्चा आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आयोजित मोर्चाचे संपूर्ण बीड शहरात बॅनर लागल्याचे बघायला मिळतंय. संतोष देशमुख यांची हत्या म्हणजे माणुसकीची हत्या, असा उल्लेख या बॅनर्सवर करण्यात आलाय. उद्या सकाळी दहा वाजता बीडच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून या मोर्चाला सुरुवात होईल. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाणार आहे. या मोर्चाबद्दल बोलताना आमदार संदीप क्षीरसागर हे म्हणाले की, ज्यादिवशी ही घटना घडली, त्यावेळी मी गावात गेलो. लोकांनी मला आरोपींची नावे सांगितले. ते घाबरलेले होते पण त्यांच्या बोलण्यात एक रोष होता. ज्या लोकांची त्यांनी नावे सांगितले त्यांची कशी दहशद आहे, हे देखील त्यांनी सांगितले.

हा फक्त त्या गावापुरता नाहीतर पूर्ण जिल्हात रोष होता. न्याय मिळून देण्यासाठी उद्याचा मोर्चा असल्याचे संदीप क्षीरसागर यांनी म्हटले. उद्या 28 तारीख आहे. इतके दिवस उलटूनही अजून आरोपीला अटक करण्यात आली नाहीये. यावेळी धनंजय मुंडे यांच्यावरही संदीप क्षीरसागर यांच्याकडून टीका करण्यात आली. क्षीरसागर म्हणाले, एकीकडे धनंजय मुंडे म्हणतात की, आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे.पूर्ण जिल्हा म्हणतो की, या हत्येचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड आहे. वाल्मिक कराडला ताब्यात दिल पाहिजे ना..पूर्ण जिल्हात म्हणतोय तोच मास्टरमाईंड आहे. त्याची चाैकशी केली पाहिजे, काय चुकीचं आहे यामध्ये. जिल्हात खोटे गुन्हे देखील दाखल केले जात असल्याचे सांगताना संदीप क्षीरसागर हे दिसले आहेत. बीडच्या घटनेबद्दल बोलताना धनंजय मुंडे यांनी काल म्हटले होते की, गुन्हेगार कोणीही असो त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. माझे राजकारण आणि समाजकारण संपवण्यासाठी माझ्यावर आरोप केले जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *