शिवमंदिरात अभिषेकासाठी शहाळं आणयला गेले अन् अनर्थ घडला, झाडावरील नारळ डोक्यात पडला

रायगडमध्ये एका व्यक्तीच्या डोक्यात नारळ पडून त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही व्यक्ती समुद्रकिनारी असताना झाडावरील नारळ तिच्या डोक्यात पडला आणि तिचा मृत्यू झाला. शिवमंदिरात अभिषेक पूजा करायची आहे म्हणून घरून शहाळे (नारळ) आणण्यासाठी गेले ते परतलेच नाही. पूजेसाठी शहाळं घ्यायला गेले आणि झाडावरील एक शहाळं येऊन डोक्यावर पडल्याने एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रायगड जिल्ह्यातील राजपुरी येथे ही हृदयद्रावक घटना घडल्याची माहिती आहे. जयेश पांडुरंग गीते (वय ४८ वर्षे, तालुका – मुरुड जंजिरा) असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. त्यांच्या मृत्यूची वार्ता गावात पोहचताच परिसरातून एकच हळहळ व्यक्त होत आहे.

रायगड जिल्ह्यातील मुरुड शहरापासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या राजपुरी येथील जयेश पांडुरंग गीते (वय ४८ वर्षे, तालुका – मुरुड जंजिरा) हे सोमवारी (६ जानेवारी २०२५) राजपुरी येथील शिवमंदिरात पहाटे अभिषेक पूजा असल्याने त्याची तयारी करीत होते. तेव्हा पुजेसाठी शहाळायाची (नारळ) आवश्यकता असल्याचं त्यांना समजलं. आहे. म्हणून जयेश गीते है शहाळे खरेदी करण्यासाठी गावापासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मुरुड शहरातील समुद्रकिनारी पोहोचले. ते रविवारी (५ जानेवारी) सायंकाळी समुद्रकिनारी आले होते.

जयेश गीते यांनी मुरुड समुद्रकिनारी श्रीयश रुग्णालयाच्या बाजूला असलेल्या चंदन खोत यांच्या शहाळे स्टॉलवरून शहाळे खरेदी कले. त्यानंतर ते राजपूरी येथील निवासस्थानी परतत असताना समुद्रकिनारी असलेल्या सुमारे ९० फूट उंच नारळाच्या झाडावरून वेगाने नारळ थेट त्यांच्या डोक्यावर येऊन पडलं आणि जयेश तिथल्या तिथेच जागीच गतप्राण झाले. या दुर्दैवी घटनेनंतर संपूर्ण मुरुड तालुक्यासह राजपुरी गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.मयत जयेश गीते हे राजपुरी कोळीवाडा येथील नौका हरिहरेश्वर या बोटीचे तांडेल आहेत. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगी व दोन मुलगे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या अशा अचानक जाण्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *