होळीला गावी जाणाऱ्यांसाठी खूशखबर! ‘या’ मार्गावर धावणार आणखी दोन एक्स्प्रेस, असे आहे नियोजन.

होळी सणाच्या निमित्ताने प्रवासी मागणी वाढल्याने मध्य आणि कोकण रेल्वेने आणखी दोन साप्ताहिक विशेष रेल्वे गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. होळी सणाच्या निमित्ताने प्रवासी मागणी वाढल्याने मध्य आणि कोकण रेल्वेने आणखी दोन साप्ताहिक विशेष रेल्वे गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. मडगाव ते पनवेल आणि मडगाव ते लोकमान्य टिळक टर्मिनसदरम्यान या गाड्या धावणार आहेत. त्यांचे आरक्षण खुले झाले आहे. थांबे कोणते असणार? जाणून घ्या सविस्तर…गाडी क्रमांक ०११०२ मडगावहून सकाळी ८.०० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी पनवेलला सायंकाळी ५.३० वाजता पोहोचेल. परतीचा प्रवास (०११०१) पनवेलवरून सायंकाळी ६.२० वाजता सुरू होईल आणि मडगाव येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ६.४५ वाजता पूर्ण होईल.

१५ आणि २२ मार्च रोजी ही गाडी धावणार आहे.करमाळी, थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा,पेण.गाडी क्रमांक ०११०४ मडगावहून दुपारी ४.३० वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ६.२५ वाजता एलटीटी येथे पोहोचेल. १६ आणि २३ मार्चला ही गाडी धावणार आहे.

परतीचा प्रवास (०११०३) एलटीटीहून सकाळी ८.२० वाजता सुरू होईल आणि मडगाव येथे त्याच दिवशी रात्री ९.४० वाजता ही गाडी पोहोचेल. १७ आणि २३ मार्चला ही गाडी धावणार आहे.करमाळी, थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेण, पनवेल, ठाणे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *