अवघ्या 3 तासात बॅग शोधून काढली.आणि निष्पाप मुलांचे व एका महिलेचे बळी घेणारे यांना अजूनही का अटक झालेली नाही?

५ मे २०२४ | जळगाव शहरातील इंद्रनील सोसायटी परिसरात राहणारे कुटुंबीय गावाला जात होते. रेल्वेने जाण्यासाठी जळगाव रेल्वे स्थानक येथे आले असता तिकीट खिडकी वर तिकीट घेतांना दागिने आणि मौल्यवान ऐवज असलेली बॅग बाहेरच राहिली. काही वेळातच प्रकार लक्षात आला मात्र तोवर बॅग जागेवर नव्हती. रेल्वे पोलिसात तक्रार नोंदविल्यावर याबाबत शहर पोलिसांना कळविण्यात आले. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल भावरी यांनी तात्काळ जळगांव पोलिसांच्या (सी.सी.टी. व्ही विभाग) नेत्रम कक्षाच्या माध्यमातून शहरातील फुटेज तपासले असता एक वयस्क महिला बॅग घेऊन जातांना दिसली पुढील फुटेज पाहिले असता सदर महिला 3 रिक्षा बदलून मोहाडी गावात उतरली असल्याचे रिक्षाचालक यांनी सांगितले असे नेत्रम चे कर्मचारी मुबारक देशमुख यांनी निरीक्षक भवारी यांना कळविले त्या आधारे अवघ्या 3 तासात मोहाडी गावातून बॅग शोधून काढली

शहर पोलिसांनी नेत्रमच्या मदतीने लावला छडा पोलीस अधिक्षकांच्या हस्ते परत केले दागिने शहर पोलिसांनी मोहाडी गावात जाऊन चौकशी केल्यावर वृद्ध महिलेचे घर गाठले आणि बॅग ताब्यात घेतली. बॅगेतील सर्व ऐवज सुरक्षीत असल्याची खात्री पटल्यावर पोलिसांनी बॅग पोलीस ठाण्यात आणली. पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते बॅग आणि दागिने बडगुजर कुटुंबाकडे सुपूर्द करण्यात आले. शहर पोलीस आणि नेत्रम कक्षाच्या माध्यमातून अवघ्या काही तासात बडगुजर कुटुंबाला आपला ऐवज परत मिळाल्याने त्यांना आनंद झाला होता. पोलिसांचे त्यांनी आभार मानले.

निष्पाप मुलांचे व एका महिलेचे बळी घेणारे हे नशेत धुंद होऊन गाडी चालवीत होतें. आणि यांच्या अश्या चुकीमुळे एक गरीब परिवार उध्वस्त झालेला आहे. ही आहेत करोडपती बाप अभिषेक कौल आणि संजय पवार जिल्हा बँक चेअरमन यांची मुले यांना पाठीशी घालणारे यांना अजूनही अटक झालेली नाही. अश्या या हरामखोराना आपलेच संकट मोचक म्हणवून घेणाऱ्या नेत्याला गरीबच संकट काहीच वाटत नाही का. कारण यांना यांचे करोडपती नेते हवेत. तुम्ही काय एक दिवस त्यांना मतदान केलत का तुमचा विषय संपतो. पण यांना तर हे करोडपती निवडणुकीला कोट्यानी पैसे देतात. मग तुम्हास न्याय कुठून मिळणार.. जल संपदा मंत्री यांच्या मध्ये एवढी पॉवर आहे की हे ह्या आरोपींना एका मिनटात अटक करायला लावतील. पण यांना त्यांना अटक न करता पाठिंबा द्यायचा आहे. आणि आपले समाजातील दलाल … नेते यांचा प्रचार तांड्या वर जावून यांना मतदान करा म्हणून हात जोडतात. लाज वाटली पाहिजे आपल्या अश्या समाजाच्या नेत्यांना. अहो एकाच दिवशी लोंढरी गावातून 3 प्रेतयात्रा निघते पूर्ण समाजातुन शोककळा पसरली असुन आपण मात्र यांचा प्रचार करण्यात व्यस्त आहोत..

पोलीस का या आरोपीला पकडत नाहीत? दया दाल मी कुश काला हे!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *