रायगड जिल्ह्यात पहिल्यांदाच यूपीएससीचे केंद्र असल्यामुळे कर्मचाऱ्यांना पथकाकडून मार्गदर्शन करण्यात आले. ९ ते ११ मार्चदरम्यान काही परीक्षा केंद्रांची पाहणी करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. एप्रिलमध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी परीक्षार्थींनी नवी मुंबईत पनवेल येथे परीक्षा केंद्रासाठी पसंती दिल्यामुळे पनवेलमध्ये परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा पहिल्यांदाच पनवेलमध्ये होणार होणार आहे. […]